5000 mAh बॅटरी, 50MP कॅमेरासह Motorola चा नवीन फोन भारतात लाँच, किंमत 9999 रुपयांपासून…
मोटोरोला मोटो जी 22 (Motorola Moto G22) हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सेलचा (50MP camera) प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.
मुंबई : मोटोरोला मोटो जी 22 (Motorola Moto G22) हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सेलचा (50MP camera) प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे. लेनोवोच्या मालकीच्या कंपनीने या फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा स्मार्टफोन स्टॉक अँड्रॉइडवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये हेलियो जी 37 (Helio G37) चिपसेट वापरण्यात आला आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. ई-कॉमर्स साईटने 13 एप्रिल रोजी या फोनचा पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे.
Motorola Moto G22 स्मार्टफोन 10999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यासोबतच कंपनीने यावर लॉन्च ऑफरही दिली आहे, जी 13 आणि 14 एप्रिल हे दोन दिवस चालेल. या ऑफर अंतर्गत, हा स्मार्टफोन 1000 रुपयांनी स्वस्त किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. लाँच ऑफर काळात या मोबाइलची किंमत 9999 रुपये असेल.
Motorola Moto G22 चे स्पेसिफिकेशन्स
Motorola Moto G22 स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.5-इंचाचा LCD डिस्प्ले आहे. त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. यामध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये पंच होल कटआउट देखील देण्यात आला आहे. हा एंट्री लेव्हल फोन आहे आणि याला MediaTek Helio G37 चिपसेट देण्यात आला आहे.
Moto G22 चा कॅमेरा सेटअप
Motorola Moto G22 च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, या फोनच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, तर यात 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. तसेच या फोनमध्ये 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला रआहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीने या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Motorola Moto G22 ची बॅटरी
या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 20W टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते. USB Type-C पोर्ट चार्जिंगसाठी उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे एवढ्या मोठ्या क्षमतेची बॅटरी असूनही हा स्मार्टफोन अतिशय पातळ आहे.
Motorola Moto G22 मधील अन्य फीचर्स
Moto G22 स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक, अॅम्बियंट लाइट सेन्सर, एक्सेलेरोमीटर सेन्सरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, जो लॉक केलेला स्मार्टफोन बायोमेट्रिक पद्धतीने अनलॉक करण्याचे काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात वायफाय, ब्लूटूथ, एफएम रेडिओ, जीपीएस आणि 3.5 एमएम हेडफोन जॅकही देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G37 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये फक्त 4G LTE सिम कार्ड सपोर्ट असेल.
इतर बातम्या
Budget Gaming Phone: 12 हजार रुपयांच्या रेंजमध्ये टॉप 4 स्मार्टफोन्स, यादीत Redmi ते Moto चे पर्याय
10000 रुपयांच्या रेंजमध्ये 50MP कॅमेरा स्मार्टफोन, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील
‘Google Mapच्या नवीन फीचरमुळे प्रवास अधिक सोपा! कसं वापरायचं नवं फिचर? जाणून घ्या