मोटोरोला वन व्हिजन लाँच, पंचहोल डिस्प्लेसह 25 मेगापिक्सल कॅमेरा
मुंबई : मोटोरोला कंपनीने नवीन स्मार्टफोन मोटोरोला वन व्हिजन लाँच केला आहे. मोटोरोला वन व्हिजन सध्या ब्राझीलमध्ये लाँच केला आहे आणि लवकरच इतर देशात लाँच केला जाणार आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे फोनमध्ये पंचहोल डिस्प्ले आणि ड्युअलर रिअर कॅमेरा दिला आहे. फोनची किंमत 299 यूरो म्हणजे अंदाजे 23 हजार 500 रुपये आहे. हा फोन सफायर […]
मुंबई : मोटोरोला कंपनीने नवीन स्मार्टफोन मोटोरोला वन व्हिजन लाँच केला आहे. मोटोरोला वन व्हिजन सध्या ब्राझीलमध्ये लाँच केला आहे आणि लवकरच इतर देशात लाँच केला जाणार आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे फोनमध्ये पंचहोल डिस्प्ले आणि ड्युअलर रिअर कॅमेरा दिला आहे. फोनची किंमत 299 यूरो म्हणजे अंदाजे 23 हजार 500 रुपये आहे. हा फोन सफायर ब्ल्यू आणि ब्राऊन रंगात उपलब्ध आहे.
मोटोरोला वन व्हिजनचे स्पेसिफिकेशन
फोनचे स्पेसिफिकेशन पाहिले तर यामध्ये पंचहोल डिस्प्ले दिला आहे. पंचहोल म्हणजे डिस्प्लेमध्ये एक होल आहे ज्यात फ्रंट कॅमेरा दिला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. या फोनमध्ये अँड्रॉईड पाय 9.0 व्हर्जन दिला आहे. याशिवाय फोनमध्ये हायब्रिड ड्युअल सिम स्लॉट दिला आहे.
मोटोरोला वन व्हिजन कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी
याफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्य 48+5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 25 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. यासोबतच फ्लॅश लाईटही देण्यात आली आहे.
फोनमध्ये 3500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी टर्बोपॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 15 मिनिट चार्जिंग केल्यानंतर फोन 7 तास वापरू शकता, असा दावा कंपनीने केला आहे. कनेक्टव्हिटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ V5, यूएसबी टाईपी-सी, 305 एमएमचा हेडफोन जॅक, एनएफसी आणि जीपीएस मिळणार आहे. फोनचे वजन 181 ग्राम आहे.