Motorola चा फोल्डेबल फोन 50 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या कुठून खरेदी करता येईल

मोटोरोलाने (Motorola) गेल्या वर्षी त्यांचा फोल्डेबल स्मार्टफोन मोटो रेझर (Moto Razr) लॉन्च केला होता. कंपनीने या फोनची किंमत कमी केली आहे.

Motorola चा फोल्डेबल फोन 50 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या कुठून खरेदी करता येईल
Moto-Razr
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 11:16 AM

मुंबई : मोटोरोलाने (Motorola) गेल्या वर्षी त्यांचा फोल्डेबल स्मार्टफोन मोटो रेझर (Moto Razr) लॉन्च केला होता. सुरवातीला, कंपनीने या फोनची किंमत खूपच जास्त ठेवली होती, त्यामुळे बरेच लोक हा फोन आवडलेला असूनही केवळ किंमतीमुळे खरेदी करु शकले नाहीत. अशा परिस्थितीत तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण कंपनीने या फोनची किंमत 50 हजार रुपयांनी कमी केली आहे.

कंपनीने या फोल्डेबल स्मार्टफोनची नवीन किंमत त्यांची अधिकृत वेबसाइट मोटोरोला डॉट इनवर लिस्ट (सूचीबद्ध) केली आहे. मोटोरोलाने गेल्या वर्षी हा फोल्डेबल स्मार्टफोन 1,24,999 रुपये किंमतीसह बाजारात दाखल केला होता, परंतु आता या फोनच्या किंमतीत आता 50,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता तुम्ही हा स्मार्टफोन केवळ 74,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. (Motorola Razr price dropped in India by Rs 50000 know now how much you have to pay for this foldable phone)

मोटोरोलाच्या या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 21: 9 च्या अॅस्पेक्ट रेशोसह 6.2 इंचाचा फ्लेक्सिबल ओएलईडी डिस्प्ले मिळेल. याशिवाय यात क्विक व्ह्यू एक्सटर्नल डिस्प्लेही देण्यात आला आहे. या दोन्ही डिस्प्लेमध्ये प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आला आहे. मोटो रेझरमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे आणि ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो 616 जीपीयू आहे देण्यात आला आहे. याच्या स्टोरेजबद्दल सांगायचे झाले तर यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या मागील बाजूस 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटला सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर मिळेल. फोनचा रियर कॅमेर लेसर ऑटोफोकस, नाइट व्हिजन मोड आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलायजेशन यासारख्या फीचर्ससह येतो.

फोनला पॉवर देण्यासाठी 2,800 mAh बॅटरी देण्यात आली असून यासह तुम्हाला 15 वॉटचा टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. कनेक्टिव्हिटीच्या पर्यायांविषयी बोलायचे झाले तर यात 5 जी आणि 4 जी सपोर्ट असेल तसेच वाय-फाय 802.11 बी / जी / एन / एसी, एनएफसी, जीपीएस / ए-जीपीएस, ग्लोनास, ब्लूटूथ 5.0 आणि चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला आहे.\

इतर बातम्या

जबरदस्त फीचर्ससह Huawei चा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, भारतात सेल कधी?

6000mAh बॅटरी, 48MP ट्रिपल कॅमेरा, कॅशबॅक ऑफरसह POCO M3 खरेदी करा

ट्रिपल कॅमेरासह Redmi 9 Power चं 6GB रॅम वेरिएंट भारतात लाँच, किंमत…

(Motorola Razr price dropped in India by Rs 50000 know now how much you have to pay for this foldable phone)

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.