Jioचा कमी किमतीचा 365 दिवसांचा धमाकेदार प्लॅन, उत्तम ऑफर्सचा असा घ्या लाभ
जर तुम्ही जिओ वापरकर्ता असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला 912.5 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता देखील एक वर्ष आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला आणखी बरेच फायदे मिळत आहेत चला जाणून घेऊयात या नवीन प्लॅनबद्दल...

जेव्हा जेव्हा रिचार्ज प्लॅन घेण्याची वेळ येते तेव्हा बहुतेकदा त्याची वैधता आणि डेटावर आपण सर्वजण लक्ष केंद्रित करत असतो. ज्या प्लॅनमध्ये या दोन्ही गोष्टी येत असतील तो प्लॅन फायदेशीर असतो. त्यानंतर आपण रिचार्ज करतो. ग्राहकांच्या या गरजा लक्षात घेता त्यामुळे आपल्या भारतातील प्रत्येक टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन लॉंच करत असतात . अशातच रिलायन्स टेलिकॉम कंपनी सुद्धा त्यांच्या युजर्सना अनेक उत्तम ऑफर्स देतात. अशातच जिओचा हा प्लॅन तुमच्यासाठी खूप चांगला ठरू शकतो. या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता आणि 912.5 जीबी डेटा मोफत मिळत आहे. याशिवाय तुम्ही अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएस सुविधा देखील मोफत मिळवू शकता.
जिओचा 3999 रुपयांचा प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 912.5 जीबी डेटा वापरण्यासाठी मिळतो. तर तुम्ही दररोज 2.5 जीबी हाय स्पीड डेटा वापरू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळत असल्याने तुम्ही मनोरंजनाचा पूर्ण लाभ घेऊ शकता. हे सबस्क्रिप्शन तुम्ही टीव्ही आणि मोबाईल दोन्हीवर 90 दिवस चालू शकता. याशिवाय, यामध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस मोफत मिळतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचे सबस्क्रिप्शन देखील मिळू शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या जिओ नंबरने लॉगिन करावे लागेल.
3599 रुपयांचा प्लॅन
जिओचा हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला 912.5 जीबी डेटा वापरता येईल. यामध्ये तुम्हाला दररोज 2.5 जीबी डेटा वापरण्यास मिळतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यात 50 जीबी जिओ एआय क्लाउड स्टोरेज मिळते. याशिवाय, तुम्ही 90 दिवसांच्या वैधतेसह JioHotstar चा आनंद घेऊ शकता. ही योजना घेतल्यानंतर तुमचे संपूर्ण वर्षाचे टेन्शन निघून जाईल. दर महिन्याला पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. याशिवाय तुम्ही आणखी रिचार्ज प्लॅन पाहू शकता. तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार तुम्ही निवडू शकता.