OTT प्लॅटफॉर्मवर जिओ सिनेमाचा २९ रुपयांत २८ दिवसांची वैधता असलेला प्लॅन, जाणून घ्या

तुम्ही जर स्वस्त ओटीटी प्लॅटफॉर्मच्या शोधात असाल तर जिओ सिनेमा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला भरपूर सिनेमे आणि टीव्ही शो मिळतात. याची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनची संपूर्ण माहिती इथे वाचा.

OTT प्लॅटफॉर्मवर जिओ सिनेमाचा २९ रुपयांत २८ दिवसांची वैधता असलेला प्लॅन, जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 3:41 PM

मुकेश अंबानी त्यांच्या जिओ ग्राहकांसाठी अनेक ऑफर लाँच करत असतात. देशात सर्वात मोठी टेलिकॉम कंपनीपैकी जिओ कंपनी आहे. सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा मनोरंजनाचा लाभ मिळावा यासाठी अनेक स्वस्त प्लॅन लाँच केले आहेत. अशातच OTT प्लॅटफॉर्मवर असलेल्या जिओ सिनेमावर तुम्हाला सर्वोत्कृष्ट कंटेंट स्ट्रीम करायला मिळतो. तसेच अनेक प्रकारचा कंटेंट उपलब्ध आहे. ज्यात बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपट, वेब सीरिज, टीव्ही शो, रिॲलिटी शो, डॉक्युमेंटरीज, आयपीएल, लहान मुलांसाठी वेगवेगळे शो यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे जिओ सिनेमा मोफत बघायचा असेल तर हा फ्री कंटेंटही पाहायला मिळतो. परंतु सब्सक्रिप्शनसह, आपण अधिक कंटेंट पाहू शकाल.

जिओ सिनेमाचे अनेक प्लॅन आहेत, पण इथे आम्ही तुम्हाला मासिक आणि वार्षिक अशा दोन प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. यात महिन्याचा प्लॅन 29 रुपयांमध्ये येतो. तर, त्याचा वार्षिक प्लॅन मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 299 रुपये खर्च करावे लागतील.

जिओ सिनेमाचा 29 रुपयांचा प्लॅन

जिओ सिनेमाच्या 29 रुपयांचा या प्लॅनमध्ये तुम्हाला जाहिरातींशिवाय कंटेंट स्ट्रीम करण्याची संधी मिळते. याशिवाय 4K कंटेंट आणि ऑफलाइन पाहण्याचा ही फायदा आहे. OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध प्रीमियम कंटेंट पाहता येईल. यामध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

जिओ सिनेमाच्या 29 रुपयांचा या प्लॅनमध्ये तुम्हाला विशेष मालिका, चित्रपट, हॉलिवूड चित्रपट, किड्झ शो आणि टीव्ही मनोरंजन यांचा समावेश आहे.4K पर्यंतची गुणवत्ता डाउनलोड करून नंतर पाहता येईल.

या प्लॅनमध्ये तुम्ही एका वेळी फक्त एका डिव्हाइसवर जिओ सिनेमा ॲक्सेस करू शकता. मग तो टीटी असो, लॅपटॉप असो किंवा मोबाइल.

यासोबतच स्पोर्ट्स आणि लाईव्ह चॅनेल वगळता इतर सर्व कंटेंट जाहिरातींशिवाय तुम्हाला पाहता येणार आहे. जिओ सिनेमा मध्ये फॅमिली प्लॅन देखील दिला जातो. ज्यात एकावेळी एक-दोन नव्हे तर चार डिव्हाइस लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकतात.

जिओ सिनेमाचा वार्षिक प्लॅन

याप्लॅनमध्ये तुम्ही जिओ सिनेमाचा सर्व प्रीमियम कंटेंट चांगल्या गुणवत्तेसह पाहू शकता. हा प्लॅन २९९ रुपयांचा असून १२ महिन्यांची वैधता देण्यात आली आहे. या प्लॅनमध्येही तुम्हाला जाहिरातींशिवाय कोणताही प्रीमियम कंटेंट पाहायला मिळेल.

'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?.
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.