मोठ्या फाईल्स अपलोड करायच्यात, जिओचा हा नवीन रिचार्ज प्लान खास तुमच्यासाठी, मिळणार अनलिमिटेड इंटरनेट
जिओच्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा मुकेश अंबानीने स्वस्त रिचार्ज प्लान लाँच केला आहे. जिओ कंपनीने ११ रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लान आणून कोट्यवधी यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे.
जिओच्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा मुकेश अंबानीने स्वस्त रिचार्ज प्लान लाँच केला आहे. जिओ कंपनीने ११ रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लान आणून कोट्यवधी यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्या ग्राहकांना फास्ट इंटरनेट हवं आहे त्यांच्यासाठी हा रिचार्ज प्लॅन आहे. हा छोटासा रिचार्ज प्लान आल्याने एअरटेल, बीएसएनएल आणि व्होडाफोनसारख्या कंपन्यांनाही विचार करण्यास भाग पाडलंय. रिलायन्स जिओचा उद्देश हा प्रीपेड प्लान अधिक डेटा वापरणाऱ्या युजर्सना खास खूश करण्याचा आहे. चला जाणून प्लान बद्दल…
जिओचा ११ रुपयांचा प्लान
जिओचा हा रिचार्ज प्लॅन फक्त डेटा वापरण्यासाठी केला जाऊ शकतो. केवळ ११ रुपयांत तुम्हाला १० जीबी फास्ट इंटरनेट मिळणार आहे. पण लक्षात ठेवा हा प्लान तुमच्याकडे आधीपासून असलेल्या कोणत्याही प्लॅनसोबत काम करेल आणि हा १० जीबी डेटा फक्त एका तासासाठी वैध राहणार आहे.
त्याचसोबत मोठं मोठ्या रिचार्ज कंपन्यांपैकी एअरटेलनेही असाच एक सेम प्लॅन काढला आहे. जो ११ रुपयांत १० जीबी डेटा मिळणार आहे, जो फक्त एक तास चालेल. जिओ आणि एअरटेलचे हे प्लॅन त्यांच्यासाठी आहेत ज्यांना वारंवार मोठ्या फाईल्स किंवा सॉफ्टवेअर अपडेट्स डाऊनलोड करावे लागतात. दुसरीकडे बीएसएनएलचा सर्वात लहान डेटा पॅक १६ रुपयांचा आहे, जो केवळ २ जीबी फास्ट इंटरनेट ऑफर करतो, जो एका दिवसासाठी वैध आहे. त्यामुळे जिओ कंपनीने आता इतर रिचार्ज कंपन्यांनादेखील ग्राहकांसाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन आणण्यासाठी भाग पाडले आहे.
अपडेट्ससाठी उत्तम प्लान
आपल्या फोनमध्ये अँड्रॉइड आणि iOS अपडेट्सची साईज ४ जीबीपेक्षा मोठी असते. पण टेलिकॉम कंपन्या युजर्संना दररोज फक्त ३ जीबी डेटा देतात. ज्यामुळे युजर्सला वाय-फायचा वापर करावा लागतो किंवा अपडेट डाऊनलोड करण्यासाठी रात्रभर थांबावे लागते. ज्यांना लवकर आणि सहज अपडेट्स डाऊनलोड करायचे आहेत त्यांच्यासाठी हा जिओचा ११ रुपयांचा छोटा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.