मुकेश अंबानी देत आहेत 84 दिवसांसाठी प्राइम-जिओ सिनेमासह OTT सब्सक्रिप्शन मोफत
जर तुम्ही जिओचे सिम वापरत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मुकेश अंबानी जिओ ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन आणत असतात. जे वेगवेगळ्या वैधता आणि किंमतीत येतात. जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी ॲमेझॉन प्राइम आणि जिओ सिनेमाचे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे.
रिलायन्स जिओ कंपनी त्यांच्या युजर्ससाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन आणत असते. कंपनी जिओ ग्राहकांना कमी किंमतीत अधिक फायदे देते. ऑफर केलेल्या प्लॅनमध्ये म्हणजेच जिओच्या अनेक रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, फ्री एसएमएस आणि ओटीटी सब्सक्रिप्शन यासारखे ऑफर मिळतात. आम्ही तुम्हाला जिओच्या काही प्लॅन्सबद्दल सांगतो ज्यामध्ये तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मचा फ्री ॲक्सेस मिळत आहे. यामध्ये ॲमेझॉन प्राईम लाइट आणि जिओ सिनेमाचा ॲक्सेस देण्यात आला आहे.
जिओचा ८४ दिवसांचा व्हॅलिडिटी प्लॅन
जिओचा ८४ दिवसांचा व्हॅलिडिटी प्लॅन मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 1,029 रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळत आहेत. यात तुम्हाला एकूण १६८ जीबी डेटा मिळतो. तर डेली हाय स्पीड 2 जीबी वापरू शकता. तसेच युजर्संना दररोज १०० एसएमएसही मिळतात. मनोरंजनासाठी या प्लॅनमध्ये ॲमेझॉन प्राइम लाइट, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
जिओ सिनेमा 72 दिवसांच्या वैधतेसह विनामूल्य
जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 72 दिवसांची वैधता मिळते. तर अनलिमिटेड डेटामध्ये तुम्हाला एकूण १६४ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. त्याचबरोबर रोज हाय स्पीड 2 जीबी डेटा + 20 जीबी वापरण्याची संधी या प्लॅनमध्ये देण्यात आली आहे. अश्यातच तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देखील मोफत मिळतात. या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचे सब्सक्रिप्शन देखील दिले जात आहे.
महिन्याचे २७६ रुपये असलेल्या प्लॅनची ३६५ दिवसांची वैधता
हा प्लॅन तुम्हाला पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याच्या टेन्शनपासून मुक्त करेल. कारण या प्लॅनची वैधता एक वर्षासाठी असून यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि ओटीटी सब्सक्रिप्शन ३६५ दिवस मिळत आहे. प्लॅनमध्ये एकूण ९१२.५ जीबी डेटा मिळतो. तुम्ही दररोज हाय स्पीड 2.5 जीबी डेटा वापरू शकता. या प्लॅनमध्ये जिओ सिनेमाचे बेनिफिट्सही मिळतात.