मुकेश अंबानी यांचा मोठा प्लॅन, 4G-5G नाही तर ता थेट सॅटेलाईटद्वारे येईल तुफान

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांनी 4जी आणि 5जी जागतात धुमाकूळ घातला आहे. आता कम्युनिकेशन व्यवसायात ते पुन्हा तुफान आणणार आहेत. त्यासाठी एक जोरदार प्लॅन ते लवकरच घेऊन येणार आहे. त्यांचे रिलायन्स जिओ लवकरच थेट सॅटेलाईटच्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्रात सेवा देण्याची तयारी करत आहे. त्यामुळे इंटरनेट अनेक पटीने धावेल.

मुकेश अंबानी यांचा मोठा प्लॅन, 4G-5G नाही तर ता थेट सॅटेलाईटद्वारे येईल तुफान
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 11:29 AM

नवी दिल्ली | 2 डिसेंबर 2024 : मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. या श्रीमंतीत जिओचा सर्वात मोठा हात आहे. रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती आणली. जिओने देशातीप पहिली 4जी आणि नंतर 5जीची सेवा सुरु केली. त्याआधारे दूरसंचार सेवेत वेगवान क्रांती घडवली. आता रिलायन्स जिओने आणखी एक जबरदस्त योजना तयार केली आहे. अंबानी यांचे रिलायन्स जिओ लवकरच थेट सॅटेलाईटच्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्रात सेवा देणार आहे. त्याआधारे देशातील ग्राहकाला आता झटपट संवाद साधता येईल.

मिळू शकतात अधिकार

रिलायन्स जिओला आता लवकरच सॅटेलाईट बेस्ड कम्युनिकेशन्स सर्व्हिससेचे अधिकार मिळू शकतात. कॅपनी सॅटेलाईट आधारे गिगाबिट फायबर सेवा सुरु करु शकते. त्यासाठी ‘इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायजेशन सेंटर (IN-SPACe) कडून जिओला याच महिन्यात परवानगी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रिलायन्स जिओने यासंबंधीत सर्व कागदपत्रे IN-SPACe कडे जमा केल्याचा दावा ईटीने सूत्रांच्या माहिती आधारे केला आहे. ‘इन-स्पेस’ ही देशातील अंतराळ क्षेत्राशी संबंधित नियंत्रक आहे. भारतात कोणत्याही प्रकारच्या ग्लोबल सॅटेलाईट बँडविथचा सेट अप करण्यासाठी इन-स्पेसची परवानगी आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

परवानगी मिळणे सोपे नाही

सॅटेलाईट संवाद सेवा सुरु करण्यासाठी इन-स्पेसकडून परवानगी मिळणे एकदम सोपे काम नाही. त्यासाठी केवळ एका विभागाची नाही तर अनेक विभागांची, मंत्रालयांची परवानगी मिळवावी लागते. तसेच संरक्षणाविषयीच्या निकषांची पूर्तता करावी लागते. तरच पुढील प्रक्रियेला हिरवा कंदिल मिळतो. अर्थात या संपूर्ण प्रकरणात इन-स्पेसचे चेअरमन पवन गोयनका यांनी कोणतीही परवानगी देण्यास मनाई केली आहे.

एलॉन मस्क पासून ते भारती एअरटेल स्पर्धेत

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओला बाजारात अगोदरच सुनील भारती मित्तल यांची एअरटेल आव्हान देत आहे. आता सॅटेलाईट क्षेत्रात पण एअरटेलसह एलॉन मस्क यांची Starlink पण मैदानात उतरली आहे. त्यामुळे रिलायन्सला या क्षेत्रात जोरदार आव्हान आहे. एअरटेलने यापूर्वी त्यांच्या OneWeb सेवेचा प्रारंभ केला आहे. इतकेच नाही तर एमेझॉन आणि टाटा पण संयुक्तपणे या क्षेत्रात उडी घेणार आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.