ना Elon Musk ची माघार, ना सरकार, मग काय दोन्ही दिग्गजांमध्ये Twitter च बंद पडलं की राव, या देशात मस्क सत्तापालट करणार?
Elon Musk X Twitter : ना Elon Musk ची माघार, ना सरकार, मग काय ताणलं की तुटतं म्हणतात, तसंच झालं. सरकारच्या धोरणानुसार न वागल्याचा मोठा फटका एलॉन मस्क यांना बसला. या दोन्ही दिग्गजांमधील भांडणात या देशात Twitter बंद पडलं. एक्स बंद पडलं.
ब्राझीलमध्ये एलॉन मस्कचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Twitter) बंद पडले आहे. आता ब्राझील युझर्स एक्स सेवेचा वापर करु शकणार नाहीत. मोबाईल आणि वेब व्हर्झन दोन्ही सेवा ब्राझीलमध्ये बंद करण्यात आल्या आहेत. ब्राझीलच्या सुप्रीम कोर्टाने याविषयीचा आदेश दिला आहे. त्यानुसार, एक्सची सेवा बंद करण्याचा आदेश लागू करण्यात आला आहे. ब्राझील सर्वोच्च न्यायालय आणि टेस्लाचे सीईओ आणि ट्विटरचा मालक एलॉन मस्क यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे.
ब्राझील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अलेक्झांडर डि मोरियस यांनी संपूर्ण देशात एक्स बंद करण्याचा मोठा निर्णय दिला. हा महत्वपूर्ण निकाल त्यांनी शुक्रवारी दिला. ब्राझीलमध्ये एक्सवर गंभीर आरोप आहेत. ब्राझीलमध्ये सत्तांतर करण्यासाठी आणि लोकशाही कमकुवत करण्यासाठी तसा कंटेंट पुरवण्यात आल्याचा आरोप ट्विटरवर करण्यात आला आहे. काय आहे हे प्रकरण?
24 तासांत नियुक्त करा अधिकारी
ब्राझील सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अलेक्झांडर डी मोरियस यांनी एक्सला आदेश दिला होता. त्यानुसार येत्या 24 तासात याप्रकरणी एक कायदेशीर अधिकारी नेमण्यात यावा. पण कंपनीने असा कोणताही अधिकारी नेमला नाही. त्यानंतर ब्राझीलच्या सुप्रीम फेडरल कोर्टाने शुक्रवारी संपूर्ण देशात एक्सवर बंदी घालण्यात आली आहे. ब्राझील न्यायालयाने जवळपास 40 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
ॲप्पल आणि गुगलला काय दिले आदेश
ब्राझील कोर्टाने राष्ट्रीय दूरसंचार विभागाला 24 तासाच्या आत ट्वीटर बंद करण्याचा आदेश दिला आहे. यासोबतच ॲप्पल आणि गुगलला ऑनलाईन प्ले स्टोअर्सला यांना पण न्यायालयाने ॲप हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन पुढील पाच दिवसांत हे ॲप हटवण्याचे आदेश दिले आहेत.
सत्तापालटचे मोठे संकेत
एलॉन मस्क याने या सर्व प्रकरणाबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने या आदेशावर त्याचे मत व्यक्त केले आहे. त्याने एक्सवर भावना व्यक्त केल्या. ब्राझीलमधील सध्याच्या प्रशासकीय मागण्या मान्य करणे हा वेडेपणा असल्याचा जोरदार टोला लगावला. ज्यावेळी नवीन नेतृत्व येईल, तेव्हा या सर्व भूमिकेत बदल येईल, असे मोठे संकेत एलॉन मस्क याने दिले. मस्क याने जणू ब्राझीलमध्ये सत्तापालट होण्याचे संकेत दिले आहे.