इथे पाहा तुमच्या खासदार-आमदाराचं रिपोर्ट कार्ड

मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. गेल्या 10 मार्चला केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात घोषणा केली. यावेळी लोकसभा निवडणुका 7 टप्प्यांमध्ये होणार आहेत. निवडणुकांची सुरवात 11 एप्रिलपासून होणार आहेत. निवडणुकांमध्ये सर्वात महत्त्वाची जबाबदारी मतदरांची असते. कारण, तुमच्याच मतांवरुन देशाचं नेतृत्व ठरत असतं. त्यामुळे मत देण्यापूर्वी उमेदवाराबाबत, आमदार-खासदारांबाबत, सध्याच्या मंत्रीमंडळाबाबत […]

इथे पाहा तुमच्या खासदार-आमदाराचं रिपोर्ट कार्ड
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. गेल्या 10 मार्चला केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात घोषणा केली. यावेळी लोकसभा निवडणुका 7 टप्प्यांमध्ये होणार आहेत. निवडणुकांची सुरवात 11 एप्रिलपासून होणार आहेत. निवडणुकांमध्ये सर्वात महत्त्वाची जबाबदारी मतदरांची असते. कारण, तुमच्याच मतांवरुन देशाचं नेतृत्व ठरत असतं. त्यामुळे मत देण्यापूर्वी उमेदवाराबाबत, आमदार-खासदारांबाबत, सध्याच्या मंत्रीमंडळाबाबत जाणून घेणंही गरजेचं आहे.

राजकीय नेत्यांबाबत जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘नेता’ (Neta) या अॅप्लिकेशनची मदत होऊ शकते. या अॅप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमच्या आमदार, खासदारांच्या कामाचा रिपोर्ट जाणून घेऊ शकता आणि त्यांना रेटही करु शकता. या अॅप्लिकेशनला तुम्ही प्ले स्टोअरवरुन मोफत डाउनलोड करु शकता.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 2018 मध्ये हे अॅप्लिकेशन लाँच केलं. या ‘नेता’ अॅप्लिकेशनमध्ये तुम्ही पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार आणि आमदारांसोबतच सर्व पक्षांच्या नेत्यांचं रेटिंग करु शकता. तसेच कमेंटही करु शकता. या अॅप्लिकेशनला आयटी तज्ञ प्रथम मित्तल यांनी डिझाईन केलं आहे. हे अॅप्लिकेशन वेबपोर्टलमध्येही उपलब्ध आहे.

‘नेता’ या अॅप्लिकेशनचा वापर करण्यासाठी तुम्हाला ते प्ले स्टोअरवरुन डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं लोकेशन सिलेक्ट करावं लागेल. म्हणजे तुम्ही तुमच्या लोकेशनपासून दूर असल्यावरही तुमच्या भागातील नेतेमंडळींना रेट करु शकता. जर तुम्ही घरापासून दूर असाल, तर तुमचा पिनकोड किंवा मतदारसंघाचं नाव टाकून तुमच्या नेत्यांची माहिती मिळवू शकता.

डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक ऑप्शन दिसेल, यामध्ये तुम्हाला येणाऱ्या निवडणुकांत तुम्ही कुणाला मत देणार? असा प्रश्न विचारला जाईल. याचं उत्तर द्यायचं की नाही हे तुमच्यावर आहे. जर तुम्हाला या प्रश्नाच उत्तर द्यायचं नसेल तर तुम्ही ते ऑप्शन सोडून पुढील ऑप्शनवर जाऊ शकता. त्यानंतर तुम्ही नेत्यांना रेट करु शकता.

हे अॅप्लिकेशन आतापर्यंत पाच लाख लोकांनी डाउनलोड केलं आहे. जो नागरिक या अॅप्लिकेशनवर अधिक अॅक्टिव्ह असेल त्याला ‘स्टार सिटीझन’ म्हणून हायलाईट करण्यात येईल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.