काय सांगता, Youtube प्रमाणे नेटफ्लिक्स पण एकदम मोफत; पण आहे ही अट

Netflix Free : नेटफ्लिक्सवर तुमचा आवडचा कंटेंट पाहण्यासाठी युझर्सला महागडा Netflix Subscription खरेदी करावे लागते. प्रत्येक महिन्याला नेटफ्लिक्सचा महागडा प्लॅन खरेदी करावा लागतो. त्यामुळे कंपनीने आता एक भन्नाट ऑफर आणली आहे, पण ही एक अट तुम्हाला समजून घ्यावी लागेल...

काय सांगता, Youtube प्रमाणे नेटफ्लिक्स पण एकदम मोफत; पण आहे ही अट
नेटफ्लिक्सचा प्लॅन काय
Follow us
| Updated on: Jun 26, 2024 | 3:17 PM

अनेकजणांना नेटफ्लिक्सवरील वेब सीरिज अथवा इतर शो फार आवडतात. पण दरमहा महागड्या प्लॅनमुळे अनेक जण या इच्छेला मुरड घालतात. अशा युझर्सला खेचून आणण्यासाठी आता नेटफ्लिक्सने एक जोरदार उपाय केला आहे. एका वृत्तानुसार, Netflix वर लवकरच ग्राहकांना मोफत कंटेंटचा आनंद लुटता येईल. पण त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. काय आहे ही भन्नाट योजना, कसा होईल ग्राहकांचा फायदा?

Youtube प्रमाणेच नेटफ्लिक्स काम करणार

महागड्या Netflix Subscription पासून युझर्सची सुटका होईल. त्यासाठी कंपनी फ्री सब्सक्रिप्शन मॉडल बाजारात आणत आहे. हे मॉडेल युट्यूबच्या धरतीवर काम करेल. पण नेटफ्लिक्स युट्यूबप्रमाणे कसे काम करेल, हे अजून समोर आलेले नाही. युट्यूबप्रमाणे मोफत सेवा देण्यासाठी नेटफ्लिक्सवर जाहिरातींचा भडिमार असेल. कंटेंट पाहताना या जाहिराती रसभंग करतील.

हे सुद्धा वाचा

Netflix Free Plan : येथून श्रीगणेशा

ब्लूमबर्गच्या एका बातमीनुसार, कंपनी युरोप आणि आशियातील युझर्ससाठी अशी भन्नाट योजना आणण्याच्या विचारात आहे. अर्थात ही योजना कशी असेल, याविषयी कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. जर नेटफ्लिक्सने भारतात ही योजना आणली तर युझर्सला त्यांचे आवडते शोज आणि चित्रपट पाहण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही पण कंटेंट पाहु शकाल, पण जाहिरातीसह.

केनियात केली चाचणी

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, नेटफ्लिक्सने या प्रयोगाची चाचणी आफ्रिकन देश केनियात केली आहे. पण ही सेवा तात्काळ मागे पण घेण्यात आली. आता युरोपसह आशियात हा प्लॅन आणण्याच्या तयारीवर प्राथमिक बोलणी सुरु आहे. गेल्या काही वर्षांपासून नेटफ्लिक्सला Amazon Prime Video आणि Disney+ Hotstar सारख्या ओटीटी ॲप्सकडून मोठे आव्हान मिळालेले आहे.

Netflix Plans in India

सध्या भारतात नेटफ्लिक्सचा सर्वात स्वस्त मोबाईल प्लॅनची किंमत 149 रुपये आहे. नेटफ्लिक्सचे प्रिमियम मंथली सब्सक्रिप्शनची किंमत 649 रुपयांपर्यंत आहे. भविष्यात जर नेटफ्लिक्स जाहिरातींच्या आधारे मोफत योजना घेऊन आले तर युझर्सचा मोठा फायदा होईल. तर बाजारात तीव्र स्पर्धा पण असेल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.