TRAI Report : इथं नेटवर्क मिळेना! अन् स्पीड टेस्टमध्ये जिओ नंबर-1, TRAI रिपोर्ट काय सांगतो? जाणून घ्या
देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने 4G डाउनलोड स्पीडमध्ये 2 Mbps आपलं पहिले स्थान कायम ठेवलं आहे.
मुंबई : अलीकडेच जिओ (Jio) वापरणाऱ्यांच्या अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. नेटवर्क (jio network) मिळत नसल्यानं वापरणारे पार त्रस्त असल्याचं दिसून येतंय. त्यातच वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांकडून जिओ नेटवर्कच्या तक्रारींचा पाढाच कॉर्पोरेट कंपन्यांना ऐकाव्या लागतात. अन् दिसरीकडे सगळ्यात स्वस्त आणि फास्ट नेटवर्क असल्याचा दावा जिओ कंपनीकडून केला जात असतो. असो या झाल्या तक्रारी. यातच आता जिओ कंपनीसंदर्भातील एक बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने 4G डाउनलोड स्पीडमध्ये 2 Mbps आपलं पहिले स्थान कायम ठेवलं आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने एप्रिल महिन्यासाठी जारी केलेल्या आकडेवारीनुसार Jio चा सरासरी 4G डाउनलोड स्पीड 23.1 Mbps इतका मोजला गेला. मार्च महिन्यात Jio चा सरासरी 4G डाउनलोड स्पीड 21.1 Mbps होता. त्यामुळे जिओ इंटरनेटची सर्वाधिक स्पीड देणारी कंपनी ठरली आहे.
दिग्गज कंपनीचा वेग कमी
डेटा दर्शवितो की दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या व्होडाफोन-आयडियाचा Vi (Vodafone-Idea) चा 4G डाउनलोड वेग सलग दुसऱ्या महिन्यात कमी झाला आहे. तो फेब्रुवारीमध्ये 18.4 एमबीपीएसच्या डाउनलोड स्पीडवरून एप्रिलमध्ये 17.7 एमबीपीएसवर घसरला. Vi सह, सरकारी BSNL चा वेग 5.9 Mbps पर्यंत खाली आला आहे. एअरटेलचा डाउनलोड स्पीड मार्चमध्ये 1.3 Mbps वरून 13.7 Mbps झाला, जरी एप्रिलमध्ये वेग वाढून 14.1 Mbps झाला.
प्रथम क्रमांक पटकावला
एप्रिल महिन्यात Jio चा 4G डाउनलोड स्पीड Airtel पेक्षा 9.0 mbps आणि Vi India पेक्षा 5.4 mbps जास्त होता. रिलायन्स जिओने गेल्या अनेक वर्षांपासून सरासरी 4G डाउनलोड स्पीडमध्ये सातत्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. Vi India दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पहिले स्थान कायम
देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने 4G डाउनलोड स्पीडमध्ये 2 Mbps आपलं पहिले स्थान कायम ठेवलं आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने एप्रिल महिन्यासाठी जारी केलेल्या आकडेवारीनुसार Jio चा सरासरी 4G डाउनलोड स्पीड 23.1 Mbps इतका मोजला गेला. मार्च महिन्यात Jio चा सरासरी 4G डाउनलोड स्पीड 21.1 Mbps होता. त्यामुळे जिओ इंटरनेटची सर्वाधिक स्पीड देणारी कंपनी ठरली आहे.
दुसरा क्रमांक पटकावला
Vi India 8.2 Mbps सह सरासरी 4G अपलोड गतीसह चार्टमध्ये शीर्षस्थानी आहे. रिलायन्स जिओने 7.6 एमबीपीएसच्या अपलोड गतीसह दुसरा क्रमांक पटकावला. रिलायन्स जिओ ही एकमेव कंपनी होती जिच्या अपलोड स्पीडमध्ये वाढ झाली.