30 रुपयांत 22 किमी प्रवास, लवकरच नवी इलेक्ट्रिक कार

नवी दिल्ली : इंधनाच्या किंमतीत होणारी वाढ आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने निती आयोगाने देशात इलेक्ट्रिक कारचा वापर वाढवण्यासाठी एक खास योजना तयार केली आहे. यामुळे तुम्ही 30 रुपयांमध्ये 22 किलोमीटरचा प्रवास करु शकणार आहे. विशेष म्हणजे या योजनेला प्रधानमंत्री कार्यालयातून मंजुरी मिळाली आहे. आयोगाच्या या योजनेत इलेक्ट्रिक वाहनांच्या रजिस्ट्रेशन आणि रोड चार्जमध्ये सूट मिळणार […]

30 रुपयांत 22 किमी प्रवास, लवकरच नवी इलेक्ट्रिक कार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

नवी दिल्ली : इंधनाच्या किंमतीत होणारी वाढ आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने निती आयोगाने देशात इलेक्ट्रिक कारचा वापर वाढवण्यासाठी एक खास योजना तयार केली आहे. यामुळे तुम्ही 30 रुपयांमध्ये 22 किलोमीटरचा प्रवास करु शकणार आहे. विशेष म्हणजे या योजनेला प्रधानमंत्री कार्यालयातून मंजुरी मिळाली आहे. आयोगाच्या या योजनेत इलेक्ट्रिक वाहनांच्या रजिस्ट्रेशन आणि रोड चार्जमध्ये सूट मिळणार आहे. तसेच आयोगाने राज्य सरकारला इलेक्ट्रिक वाहनांसाठी सूट उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे.

30 रुपयामध्ये 22 किलोमीटरचा प्रवास

“निती आयोगाच्या योजनेनुसार तुम्ही 30 रुपयांमध्ये 22 किलोमीटरपर्यंत गाडी चालवू शकता. 30 रुपयांच्या टॉप अपसाठी तुम्हाला 15 मिनिटांची वेळ द्यावी लागणार. दिल्लीमध्ये सार्वजनिक पार्किंग स्पेस आणि इतर जागी फास्ट चार्जिंग स्टेशन लावणार आहे. कारण चार्जिंग स्टेशन वाढल्यावर इलेक्ट्रॉनिक कारची विक्री वाढेल. तसेच इलेक्ट्रॉनिक कारला फुल चार्ज करण्यासाठी 90 मिनिटं लागतील”, असं ईईएसएलचे एमडी सौरभ कुमार यांनी सांगितले.

मोबाईल अॅपने चार्जिंग करु शकता

दिल्लीमध्ये काही ठिकाणी मार्च 2019 पर्यंत 84 स्टेशन बनणार आहेत. यामध्ये खान मार्केट, जसवंत प्लेस आणि एनडीएमसीच्या इतर ठिकाणी 84 स्टेशन तयार करण्यात येणार आहेत. तसेच मोबाईल अॅपने चार्जिंग करु शकता. तसेच युजर आपला स्लॉटही निवडू शकतो.

कोणत्या कंपनीच्या गाड्यांचा समावेश

या चार्जिंग स्टेशनवर सुरुवातीला टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनींच्या गाड्यांचा समावेश असेल. इलेक्ट्रॉनिकच्या दोन चाकी किंवा तीन चाकी गाड्यांच्या चार्जिंगसाठी 15 व्हॅटच्या चार्जरचा वापर करावा लागेल. चार्जिंग स्टेशन भारत डीसी-0001 वर आधारित असतील.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.