अॅपल म्युझिकमध्ये नवे फिचर, आता गाण्याचा इतिहास जाणू शकणार

अॅपल म्युझिकमध्ये नवे फिचर, आता गाण्याचा इतिहास जाणू शकणार (New feature in Apple Music, now you can know the history of any song)

अॅपल म्युझिकमध्ये नवे फिचर, आता गाण्याचा इतिहास जाणू शकणार
आता अॅपल म्युझिकवर 8 भाषांमध्ये ऐका गाणी आणि मिळवा 75 कोटींचा एक्सेस
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 7:32 PM

नवी दिल्ली : टेक जायंट अॅपलने आपल्या अॅपल म्युझिकमध्ये एक नवे फिचर अॅड केले असून, ‘बिहाइंड द साँग्स’ असे या फिचरचे नाव आहे. यात गीतकार, निर्माते आणि सेशन संगीतकारांचे काम आणि परिश्रम दर्शविणारे रेडिओ शो, प्लेलिस्ट आणि व्हिडिओ असतील. या व्यतिरिक्त हे फिचर गाणी आणि गीतांविषयी अधिक माहिती प्रदान करेल. या व्यतिरिक्त वापरकर्त्यांना कलाकारांच्या विविध सहयोगांबद्दल देखील माहिती मिळेल. (New feature in Apple Music, now you can know the history of any song)

प्लेलिस्ट सिरीजचाही समावेश

यासह अॅपल म्युझिकमध्ये प्लेलिस्ट सिरीजही जोडली आहे, ज्यात साँगबुक, बिहाइंड द बोर्ड्स आणि लाईव्ह लिरिक्स देखील समाविष्ट केले आहेत. याशिवाय डीप हिडन मीनिंग या रेडिओ शोचा समावेशही करण्यात आला आहे, ज्यात वापरकर्ते नाईल रॉडर्सच्या गीतकारांच्या मुलाखती आणि कथा ऐकू शकतात. अॅपल वापरकर्ते एक तर अॅपल म्युझिकवर जाऊन ‘बिहाइंड द साँग्स’ सर्च करु या वेबपेजला भेट देऊ शकतात किंवा ते थेट त्यास भेट देखील देऊ शकतात. अॅपल इनसाईडरच्या वृत्तानुसार, “हे फिचर गाणी रचणार्‍या लोकांच्या प्रोफाईलसारखे दिसेल, ज्यात कलाकारांबद्दल तपशीलवार माहिती असेल.”

गाण्याची माहिती मिळेल

यात अॅपल म्युझिक मूळ व्हिडिओ सामग्री, गाण्याचे बोल, गाण्यामागील कथा, त्यात सहभागी कलाकार, लेखक याबद्दल माहिती असेल. नियाल होरान, दुआ लीपा, चार्ली एक्ससीएक्स, आर्लो पार्क्स, टन्स आणि आय, सॅम स्मिथ अशा अनेक कलाकारांचा यात समावेश असेल. अॅपलने आपल्या ‘रायजिंग स्टार अ‍ॅवॉर्ड’ सह संगीतकारांच्या समुदायावर अधिकाधिक प्रकाश टाकण्यासाठी युके आणि आयर्लंडमधील गीतकार आणि संगीतकारांचे प्रतिनिधीत्व करणारे आयव्होर नोव्हेलो अवॉर्ड्ससोबतही भागीदारी केली आहे.

आयओएस 14.5 सह अनेक फिचर येणार

अॅपलच्या ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर आयओएस 14.5 सह अनेक फिचर येणार आहेत. यामध्ये गाणी क्यूमध्ये अॅड करण्यासाठी स्वाईप जेश्चर मिळणार आहे. या फिचरमध्ये वापरकर्त्याने कोणतेही गाणे थोडेसे स्वाईप केले की ते गाणे क्यूमध्ये अॅड होईल, तर संपूर्ण स्पाईप केल्यास गाणे सुरु होईल. (New feature in Apple Music, now you can know the history of any song)

इतर बातम्या

आपण पेन्शन फंडामध्ये गुंतवणूक करता?, मग वॉरेन बफे यांचा आपल्यासाठी खास संदेश

क्रेडिट कार्ड मर्यादा वाढविण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, अडचणीत आणू शकतात बँकेच्या या ऑफर्स

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.