Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk | एलॉन मस्क याचा नवीन प्लॅन, X वापरण्यासाठी सर्वात स्वस्त सब्सक्रिप्शन

Elon Musk | सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X साठी दोन नवीन प्लॅन लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने एक बेसिक प्लॅन तयार केला आहे. त्याची किंमत सर्वात कमी आहे. तर ज्या युझर्सला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरातीची कटकट नको आहे, त्यासाठी एक Premium Plan लाँच करण्यात आला आहे. काय आहे या प्लॅनची किंमत?

Elon Musk | एलॉन मस्क याचा नवीन प्लॅन, X वापरण्यासाठी सर्वात स्वस्त सब्सक्रिप्शन
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 1:50 PM

नवी दिल्ली | 28 ऑक्टोबर 2023 : एलॉन मस्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ने युझर्ससाठी नवीन प्लॅन समोर आणला आहे. गेल्या काही दिवसांपासून याविषयीची चर्चा सुरु होती. कंपनी नवीन प्लॅन आणणार याविषयीची चंर्चा रंगली होती. ज्या वापरकर्त्यांना Ads Free अनुभव घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी कंपनीने अधिकृत प्लॅन लाँच केला होता. हा X चा Premium Plan आहे, यामध्ये युझर्सला जाहिरातींचा अडथळा येणार नाही. जाहिरात मुक्त एक्स हा प्लॅटफॉर्म त्यांना वापरता येईल. वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीचा प्लॅन घेत एक्स या मायक्रो ब्लॉगिंगचा वापर करता येईल.

बेसिक प्लॅनची किंमत किती

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने एक बेसिक प्लॅन लाँच केला आहे. हा साधा प्लॅन आहे. यासाठी युझर्सला मासिक 243 रुपये शुल्क आकारण्यात येते. वेब व्हर्जनसाठी हे शुल्क अदा करावे लागेल. यामध्ये युझर्सला जाहिराती पहाव्या लागतील. या प्लॅनमध्ये पोस्ट एडिटिंग, अनडू पोस्ट आणि इतर फीचर मिळतील. पण यामध्ये इतर क्रिएटर्स फीचर्स मिळणार नाहीत. यामध्ये ब्लू टिक पण मिळणार नाही. सध्याच्या प्रीमियम प्लॅनमध्ये 650 रुपये मासिक शुल्क असेल. यामध्ये सर्व प्रीमियम फीचर्स मिळतील. यामध्ये जाहिराती दिसतील. पण त्याचे प्रमाण कमी असेल.

हे सुद्धा वाचा

जाहिरात मुक्तीसाठी मोजा जादा पैसे

जर तुम्हाला जाहिरात नको असेल तर त्यासाठी कंपनीने एक तिसरा प्लॅन तयार केला आहे. त्यासाठी ग्राहकांना मासिक 1300 रुपये जमा करावे लागतील. त्याला कंपनीने Premium+ असे नाव दिले आहे. यामध्ये युझर्सला सर्व प्रकराच्या सुविधा आणि फिचर्स मिळतील. ग्राहकांना अनव्हेरिफाईड युझर्सच्या बदल्यात अधिक सुविधा मिळतील. हा प्लॅन सध्या वेब व्हर्जनसाटी लाँच करण्यात आला आहे. सोशल मीडिया एक्स, पूर्वी ट्विटर होते. एलॉन मस्क याने हा प्लॅटफॉर्म 44 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केले होते. हा मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म खरेदी केल्यापासून मस्कने त्यात सतत बदल केले आहे.

ट्विटरवरुन कॉलिंग

या प्लॅटफॉर्मवर Audio-Video Call चे फीचर जोडण्यात आले आहे. WhatsApp प्रमाणेच तुम्ही या प्लॅटफॉर्मवर कॉल करु शकता. अनेक युझर्सला हे फीचर आवडले नाही. एक्सचे फीचर आणि त्याचा वापर व्हॉट्सअपपेक्षा वेगळा आहे. एक्सचा वापर चॅटिंगसाठी कोणीच करत नाही. त्याचा वापर एखाद्या कम्युनिटीप्रमाणे करण्यात येतो.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.