नववर्षानिमित्त ॲमेझॉन-फ्लिपकार्टवर बंपर डिस्काउंट, कमी किंमतीत उपलब्ध आहेत ‘हे’ स्मार्टफोन

नवीन वर्षाची सुरुवात बंपर डिस्काउंटने करा. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन-फ्लिपकार्ट तुम्हाला अनेक धमाकेदार डिस्काउंट देत आहे. या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही 10 हजारापेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकता. यात अनेक टॉप ब्रँडच्या स्मार्टफोनचा समावेश आहे.

नववर्षानिमित्त ॲमेझॉन-फ्लिपकार्टवर बंपर डिस्काउंट, कमी किंमतीत उपलब्ध आहेत 'हे' स्मार्टफोन
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 4:40 PM

नवीन वर्ष सुरु झाल्याने अनेकजण नववर्षाचे औचित्य साधून काहीतरी वस्तू घरात घेत असतात. अशातच वर्षाचा पहिला दिवस आणि बंपर डिस्काऊंट म्हटलं तर सोने पर सुहागा असे बोलणे चुकीचं ठरणार नाही. कारण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म प्रत्येक ग्राहकांना नवीन वर्षात अनेक उत्पादनांवर मोठी सूट देत आहेत. ॲमेझॉन असो वा फ्लिपकार्ट, तुम्हाला जर टॉप ब्रँडचा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर स्वस्त दरात खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणते स्मार्टफोन तुम्ही 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही यावर नो कॉस्ट ईएमआय पर्याय देखील निवडू शकता. POCO C61 स्मार्टफोनवर डिस्काऊंट

जर तुमचे बजेट 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर काळजी करू नका. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन 5,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तुम्ही हवे असल्यास नो कॉस्ट ईएमआयवर देखील फोन खरेदी करू शकता. ईएमआय प्लॅन २९१ रुपयांपासून सुरू होतो. या फोनमध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे.

Samsung Galaxy M05 स्मार्टफोनवर डिस्काऊंट

ड्युअल कॅमेरा सेटअपसोबत येणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. 5000 एमएएच बॅटरी आणि 25 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील उपलब्ध आहे. ॲमेझॉनवर हा फोन 6,999 रुपयांच्या डिस्काउंटवर खरेदी करू शकता.

POCO C75 फ्लिपकार्ट डिस्काऊंट

फ्लिपकार्टवर असलेल्या या सेलमध्ये तुम्ही हा पोको कंपनीचा स्मार्टफोन ८,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तर हा फोन तुम्ही २९९ रुपयांत दरमहाच्या हप्त्यावर देखील खरेदी करू शकता. तसेच फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्म तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही देत आहे. या फोनचे तुम्हाला तीन कलर ऑप्शन मिळत आहेत. या फोनमध्ये तुम्हाला ५१६० एमएएचची बॅटरी मिळत आहे. फोटो-व्हिडिओसाठी मागील मागील बाजूस प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे.

MOTOROLA g35 5G या स्मार्टफोनवर डिस्काऊंट

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सुरु झालेल्या नववर्षानिमित्त या सेलमध्ये तुम्ही मोटोरोला हा फोन 20 % टक्के डिस्काउंटवर फक्त 9,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तुम्ही याला नो कॉस्ट ईएमआयवरदेखील खरेदी करू शकता.

याशिवाय तुम्हाला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन-फ्लिपकार्टवर 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक स्मार्टफोन्स मिळत आहेत. तुम्ही ई-कॉमर्स साईटवर जाऊन तुम्हाला अनेक कंपनीचे स्मार्टफोन दिसतील ज्याच्यावर असलेल्या सूटचा तुम्ही लाभ घेऊन नवीन फोन खरेदी करू शकता.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.