आता कुणीही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जबरदस्ती अॅड करु शकणार नाही
मुंबई : व्हॉट्सअप नेहमीच युझर्ससाठी अधिक सोयीस्कर अपडेट आणत असतो. एकीकडे भारतात लोकसभा निवडणुकांदरम्यान खोट्या बातम्या पसरु नये यासाठी ‘चेकपॉईंट टिपलाईन’ हे ऑप्शन व्हॉट्सअपने उपलब्ध करुन दिलं. त्यानंतर आता व्हॉट्सअपने एक नवीन प्रायव्हसी सेटिंग आणलं आहे. याअंतर्गत आता युझरला कुठल्या ग्रुपमध्ये अॅड व्हायचं आहे, हे ठरवता येणार आहे. म्हणजे आता कुणीही तुम्हाला जबरदस्ती कुठल्याही ग्रुपमध्ये […]
मुंबई : व्हॉट्सअप नेहमीच युझर्ससाठी अधिक सोयीस्कर अपडेट आणत असतो. एकीकडे भारतात लोकसभा निवडणुकांदरम्यान खोट्या बातम्या पसरु नये यासाठी ‘चेकपॉईंट टिपलाईन’ हे ऑप्शन व्हॉट्सअपने उपलब्ध करुन दिलं. त्यानंतर आता व्हॉट्सअपने एक नवीन प्रायव्हसी सेटिंग आणलं आहे. याअंतर्गत आता युझरला कुठल्या ग्रुपमध्ये अॅड व्हायचं आहे, हे ठरवता येणार आहे. म्हणजे आता कुणीही तुम्हाला जबरदस्ती कुठल्याही ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही.
लोकसभेत पारदर्शकता आणण्यासाठी व्हॉट्सअपने हे नवं फीचर आणलं आहे. लवकरच हे फीचर तुमच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला दिसेल. हा फीचर तुमच्या व्हॉट्सअपवर सुरु करण्यासाठी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये जावं लागेल. त्यानंतर त्यामध्ये अकाउंट-प्रायव्हसी-ग्रुप्स हे ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. यामध्येही तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील, नोबडी, माय कॉन्टॅक्ट लिस्ट आणि एव्हरीवन, यापैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडावं लागेल.
नोबडी, माय कॉन्टॅक्ट लिस्ट आणि एव्हरीवन :
नोबडी : यामध्ये कुणीही तुम्हाला इनव्हाईट पाठल्याशिवाय ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करण्यासाठी तीन दिवसांआधी प्रायव्हेट इनव्हाईट पाठवावं लागेल. त्यानंतर जर तुम्ही तीन दिवसांच्या आत या इनव्हाईटला अप्रुव्ह केलं, तरचं तुम्हाला त्या ग्रुपमध्ये अॅड करता येईल. जर तुम्ही त्या इनव्हाईटला अप्रुव्ह केलं नाही तर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये अॅड करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला कुठल्या ग्रुपमध्ये अॅड व्हायचं आहे, हे आता तुमच्या हातात असणार आहे.
माय कॉन्टॅक्ट लिस्ट : जर तुम्ही हे ऑप्शन निवडलं तर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेली कुठलीही व्यक्ती तुमच्या अप्रुव्हलशिवाय तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करु शकते.
एव्हरीवन : या ऑप्शनमध्ये कुणीही म्हणजे अनोळखी व्यक्ती किंवा ज्या व्यक्तिचा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह नाही, पण त्याच्याकडे तुमचा नंबर आहे. तो तुमच्या अप्रुव्हलशिवाय तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करु शकतो.