चार कॅमेरे आणि शानदार फिचर्ससह Nokia 5.4, Nokia 3.4 भारतात लाँच, किंमत खूपच कमी

| Updated on: Feb 10, 2021 | 1:23 PM

नोकिया मोबाईल ब्रँडने बजेट फोनच्या कॅटेगरीमध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Nokia 5.4 आणि Nokia 3.4 या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

चार कॅमेरे आणि शानदार फिचर्ससह Nokia 5.4, Nokia 3.4 भारतात लाँच, किंमत खूपच कमी
Follow us on

मुंबई : नोकिया मोबाईल ब्रँडने बजेट फोनच्या कॅटेगरीमध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Nokia 5.4 आणि Nokia 3.4 या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. नोकिया 5.4 एक क्वाड रियर कॅमेरासह सादर करण्यात आला आहे तर नोकिया 3.4 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लाँच करण्यात आला आहे. दोन्ही फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन SoCs वर चालतात. दोन्ही फोनमध्ये फ्रंट कॅमेरासाठी डिस्प्लेमध्ये पंच कटआउट होल देण्यात आला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा फोन युरोपातील काही देशांमध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर आता हा फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. (Nokia 5.4 Nokia 3.4 Launched in India With Qualcomm Snapdragon SoCs 4000mAh Batteries)

नोकिया 5.4 चे स्पेसिफिकेशन्स

नोकिया 5.4 मधील फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 6.39 इंचांचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेजॉल्यूशनसह येतो. तसेच या फोनमध्ये पंच होल कटआउट दिला आहे. जो सेल्फी कॅमेरासाठी आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 663 प्रोसेसर देण्यात आला आहे जो ऑक्टा कोर सीपीयू आणि अॅड्रिनो 610 जीपीयूसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 4 जीबी आणि 6 जीबी रॅमचा पर्याय देण्यात आला आहे.

स्टोरेजसाठी या फोनमध्ये 64 जीबी इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. नोकिया 5.4 मध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. नोकिया 5.4 मध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी 10W नॉर्मल चार्जिंगला सपोर्ट करते.

नोकिया 3.4 चे स्पेसिफिकेशन्स

नोकिया 3.4 मध्ये 6.3 इंचांचा का HD+ डिस्ले देण्यात आला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेजॉल्यूशनसह मिळतो. सेल्फी कॅमेरासाठी या फोनच्या डिस्प्लेमध्ये पंच होल कटआऊट देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर देण्यात आला आहे. जो ऑक्टा कोर सीपीयू आणि अॅड्रिनो 610 जीपीयूसह येतो. फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. युजर्स याची इंटर्नल स्टोरेज स्पेस 512 जीबीपर्यंत वाढवू शकतात.

या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा असून सोबत 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यामध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर आणि 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W नॉर्मल चार्जिंग स्पीडसह मिळते.

दोन्ही फोनच्या किंमती

Nokia 5.4 हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये सादर करण्यात आला आहे. यामधील 4GB + 64GB वेरिएंट ची किंमत 13,999 रुपये तर 6GB + 64GB वेरिएंटची किंमत 15,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे फोन 17 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट आणि नोकिया इंडियाच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होतील. यामध्ये डस्क आणि पोलर नाइट असे दोन कलर ऑप्शन देण्यात आले आहेत,

नोकिया 3.4 ची किंमत 11,999 रुपये इतकी आहे. हा फोन 4GB + 64GB स्टोरेज वेरिएंटसह सादर करण्यात आला आहे. हा फोन चारकोल, डस्क आणि Fjord कलर ऑप्शनसह सादर करण्यात आला आहे. हा फोन नोकियाच्या वेबसाइटच्या माध्यमातून प्री-बुक करता येईल. 20 फेब्रुवारीपासून याचा सेल सुरु होईल. तसेच हा फोन नोकियाची वेबसाईट, फ्लिपकार्ट, अमेझॉनसह रिटेल दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.

हेही वाचा

अवघ्या 7999 रुपयांमध्ये खरेदी करा Thomson स्मार्ट TV

अवघ्या 10 मिनिटात तुमचा फोन फुल चार्ज होणार, ढासू चार्जर लाँच होतोय

प्रतीक्षा संपली, Huawei चा फोल्डेबल फोन लाँच होतोय, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Googleचे नवे फिचर, आता स्मार्टफोनच्या कॅमेराने ‘हार्ट रेट’ तपासता येणार!

(Nokia 5.4 Nokia 3.4 Launched in India With Qualcomm Snapdragon SoCs 4000mAh Batteries)