नोकियाच्या ‘या’ स्मार्टफोनवर तब्बल 6 हजारांची सूट

नवी दिल्ली : नोकिया या नामांकित फोनच्या फॅन फेस्टिवल सेल सध्या सुरु आहे. या सेलमध्ये Nokia 8.1, Nokia 7.1, Nokia 6.1 Plus आणि Nokia 8 Sirocco या चार स्मार्टफोनवर तब्बल 6 हजारांचा डिस्काऊंट दिला आहे. नुकतंच कंपनीने Nokia 6.1 Plus आणि Nokia 5.1 Plus या दोन फोनची किंमत कमी केली होती. त्यानंतर आता नोकियाद्वारे या […]

नोकियाच्या 'या' स्मार्टफोनवर तब्बल 6 हजारांची सूट
Follow us
| Updated on: May 21, 2019 | 10:34 AM

नवी दिल्ली : नोकिया या नामांकित फोनच्या फॅन फेस्टिवल सेल सध्या सुरु आहे. या सेलमध्ये Nokia 8.1, Nokia 7.1, Nokia 6.1 Plus आणि Nokia 8 Sirocco या चार स्मार्टफोनवर तब्बल 6 हजारांचा डिस्काऊंट दिला आहे. नुकतंच कंपनीने Nokia 6.1 Plus आणि Nokia 5.1 Plus या दोन फोनची किंमत कमी केली होती. त्यानंतर आता नोकियाद्वारे या चार फोनवर 6 हजारांचा डिस्काऊंट देण्यात येणार आहे. नोकियाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबतची माहिती दिली आहे.

नोकिया इंडियाच्या वेबसाईटवरील फोन फॅन फेस्टिवलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, Nokia 8.1 या स्मार्टफोनच्या 4 GB व्हेरियंटवर 6 हजार रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येणार आहे. यासाठी FAN6000 या प्रोमोकोडचा ग्राहकांना वापर करावा लागणार आहे. त्यासोबतच Nokia 8.1 या 6 GB रॅमच्या स्मार्टफोनवर 4 हजार रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येणार आहे. यासाठी ग्राहकांना FAN4000 या प्रोमोकोडचा वापर करावा लागणार आहे.

त्याशिवाय नोकियाच्या या फोन फेस्टिवलमध्ये Nokia 7.1, Nokia 6.1 Plus आणि Nokia 8 Sirocco या फोनवर 1000 रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येणार आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीला नोकिया फोन फॅन फेस्टिवलची सुरुवात केली होती. हा सेल 24 मे रोजी संपणार आहे. नुकतंच नोकियाद्वारे Nokia 6.1 Plus आणि Nokia 5.1 Plus या दोन फोनची किंमत काही काळासाठी कमी केली होती. Nokia 6.1 Plus या स्मार्टफोनच्या 4GB रॅमच्या स्मार्टफोनवर 1 हजार 750 रुपयांचा प्रमोशनल डिस्काऊंट दिला होता. तसेच Nokia 5.1 Plus च्या 3GB  रॅमच्या स्मार्टफोनवरही 1 हजार 750 रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येणार आहे.

दरम्यान गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात Nokia 8.1 या स्मार्टफोनच्या 4GB + 64GB  आणि  6GB + 128GB हे दोन व्हेरियंट लाँच केली होते. या फोनची किंमत अनुक्रमे 26 हजार 999 आणि 29 हजार 999 इतकी आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.