Nokia चे दोन ढासू स्मार्टफोन बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
नोकिया 8 एप्रिलला एक मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी X सिरीज, G सिरीजमधील स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
मुंबई : नोकिया (Nokia) कंपनी 8 एप्रिल रोजी एक मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी X सिरीज, G सिरीजमधील स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. नोकिया जी 10 (Nokia G10), नोकिया जी 20 (Nokia G20), नोकिया एक्स 10 (Nokia X10) आणि नोकिया एक्स 20 (Nokia X20) या स्मार्टफोन्सबाबतची बरीचशी माहिती काही दिवसांपूर्वी लीक झाली होती. 8 एप्रिलच्या इव्हेंटमध्ये कंपनी हे स्मार्टफोन लाँच करु शकते. (Nokia to launch new smartphones on April 8; Nokia G10, G20 and Nokia X10, X20)
नोकियाचे एक्स सिरीज स्मार्टफोन हे बजेट 5 जी फोन असतील. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 SoC सह 5000mAh बॅटरी असेल. तर G10 आणि G20 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. हे फोन 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:30 वाजता लाँच केले जातील. परंतु आतापर्यंत फोनबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. नोकिया जी सिरीजची प्रारंभिक किंमत 11,999 रुपये असू शकते आणि हा हँडसेट ब्लू आणि पर्पल रंगात येईल.
या फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल (फीचर्स) बोलायचे झाल्यास, नोकिया जी 10 मध्ये ऑक्टा कोअर मीडियाटेक हेलियो पी 22 SoC प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तर नोकिया जी 20 मध्ये मीडियाटेक हेलियो जी 35 एसओसी प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हे फोन 3 जीबी आणि 4 जीबी रॅम अशा दोन व्हेरिएंटसह सादर केले जातील. स्टोरेजच्या बाबतीत फोनमध्ये 32 जीबी आणि 64 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात येईल.
या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये आपल्याला क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल जो 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर कॅमेरा, 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसह येईल. फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. या फोनची बॅटरी 5000 एमएएच क्षमतेची असेल, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करेल.
Nokia X10 5G, X20 5G ची किंमत आणि स्पेक्स
नोकिया X10 5G ची किमत 25,000 रुपयांच्या आसपास असू शकते. ज्यामध्ये आपल्याला 6 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज स्पेस मिळेल. त्याचबरोबर नोकिया X20 5G ची किंमत सुमारे 30,000 रुपये असू शकते. या किंमतीत आपल्याला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज पर्याय मिळेल.
आपण जर या फोनच्या कॅमेर्याबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल जो 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरासह येईल. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. हा फोन 4500mAh बॅटरीसह येईल जो 10W चार्जिंगला सपोर्ट करेल.
इतर बातम्या
True 48MP Quad Cam, 90Hz Display, बहुप्रतीक्षित Samsung F12 लाँच, किंमत 10 हजाराहून कमी
64 MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी, खास गेमर्ससाठी डिझाईन केलेला Samsung चा स्मार्टफोन लाँच
Flipkart Mobile Bonanza Sale : 9999 रुपयांपेक्षा कमी किंमतीत ढासू स्मार्टफोन खरेदी करा
(Nokia to launch new smartphones on April 8; Nokia G10, G20 and Nokia X10, X20)