AI Smartphone चे लवकरच आवतरणार युग! ChatGPT तयार करणारी कंपनी करणार कमाल
AI Smartphone | स्मार्टफोन बाजारात लवकरच धमाका होणार आहे. ॲप्पल सारख्या स्मार्टफोनची सद्दी संपणार आहे. अनेक स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांसमोर एआय स्मार्टफोनचं आव्हान उभं ठाकणार आहे. कृत्रिम बुद्धीमतवर आधारीत ChatGPT तयार करणारी कंपनी ही कमाल करणार आहे.
नवी दिल्ली | 21 February 2024 : कृत्रिम बुद्धीमतेवर (AI) सातत्याने काम करण्यात येत आहे. एआयने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या तंत्रज्ञानावरुन अनेक प्रगत देशात गदारोळ माजला आहे. हे तंत्रज्ञान घेऊन येणारी कंपनी Open AI ने आता स्मार्टफोन बाजारात पण धमाका करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने ChatGPT हे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. त्यामुळे अनेक कामं चुटकीसरशी होत आहे. AI Smartphone तयार करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. त्याचा मोठा फटका जगातील स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांना बसणार आहे. ॲप्पल सारख्या कंपन्यांची तर आताची सद्दीच संपणार आहे.
स्मार्टफोनची दुनियाच बदलणार
चॅटजीपीटीमुळे सध्या अनेक क्षेत्रात धुमाकूळ घातला आहे. या नव तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रात मोठी क्रांती येण्याची शक्यता आहे. त्याचे काही परिणाम पण दिसून येत आहे. सर्वात मोठा परिणाम हा मनुष्यबळावर होत आहे. अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. तर कृषी, औषधी, आरोग्यासह इतर अनेक क्षेत्रात मोठ्या बदलाची नांदी आली आहे. अशातच एआय स्मार्टफोन आल्यास ही तंत्रज्ञान क्षेत्रातील दखलपात्र गोष्ट ठरेल. स्मार्टफोनची दुनियाच बदलून जाईल. अनेक एप आणि फीचर्स पुरवणाऱ्या कंपन्यांवर परिणाम दिसून येईल.
Samsung ने केला श्रीगणेशा
Samsung कंपनीने या तंत्रज्ञानाचा अगोदरच श्रीगणेशा केला आहे. कंपनीने AI Support ची S24 सीरीज बाजारात आणली आहे. ही सीरीज अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकाला Circle To Search सारखे फीचर्स मिळाले आहे. ते युझर्समध्ये लोकप्रिय ठरले. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये अनेक बदल करण्यात येत आहे. तंत्रज्ञानामध्ये अनेक नवीन फीचर्स पण जोडण्यात आले आहे.
पूर्णपणे एआय आधारीत तंत्रज्ञान
याविषयीच्या वृत्तानुसार, Open AI चा नवीन स्मार्टफोन पूर्णपणे एआयवर आधारीत असेल. म्हणजे युझर्सला त्यांच्या आवडीनुसार, या स्मार्टफोनमध्ये अनेक बदल करता येण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. या स्मार्टफोनमधील फीचर्स हे अत्यंत प्रगत असतील. कंपनी अनेक वर्षांपासून त्याच्यावर काम करत आहे. त्यामुळे हा एआय स्मार्टफोन पण लवकरच बाजारात दाखल होणार आहे.