तुम्हीसुद्धा फोनच्या कवरमध्ये पैसे ठेवता? मग लगेच व्हा सावध!

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की लोकं  मोबाईल कव्हरच्या मागच्या भागात एखादी नोट ठेवतात (Note in Mobile cover). आपल्याला वाटते की येथे नोट सुरक्षित आहे आणि जेव्हा अडचण असेल तेव्हा ती आपण कव्हरमधून सहज काढू शकतो.

तुम्हीसुद्धा फोनच्या कवरमध्ये पैसे ठेवता? मग लगेच व्हा सावध!
मोबाईल कव्हरImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 7:02 PM

मुंबई : जुगाडच्या बाबतीत भारतीयांना तोड नाही. प्रत्येकच गोष्टीत, भारतीय नेहमीच जुगाड शोधून काढतात. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की लोकं  मोबाईल कव्हरच्या मागच्या भागात एखादी नोट ठेवतात (Note in Mobile cover). आपल्याला वाटते की येथे नोट सुरक्षित आहे आणि जेव्हा अडचण असेल तेव्हा ती आपण कव्हरमधून सहज काढू शकतो आणि काम भागवू शकतो, पण ही सवय धोकादायक ठरू शकते. यामुळे तुमचा जीवही जाऊ शकतो. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे, फोन कव्हरमध्ये नोट्स ठेवल्याने आग लागण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ज्याना फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय आहे. त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे.

हा धोका लक्षात घ्या

जेव्हा तुम्ही फोन बराच वेळ वापरता, व्हिडिओ पाहता किंवा कॉल करता तेव्हा फोनचा प्रोसेसर जास्त स्पीडने काम करतो, ज्यामुळे फोन गरम होतो. अशा स्थितीत फोनचे तापमान वाढते. या तापमान वाढीच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, फोनवरील कव्हर काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो.

अशा परिस्थितीत फोन केसमध्ये कोणत्याही प्रकारची ज्वलनशील वस्तू ठेवू नये, कारण फोनचा प्रोसेसर गरम झाल्यामुळे नोटला आग लागू शकते. काही काळापूर्वी अशाच अपघातात एका मुलीला आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे, नोट कव्हरच्या आत न ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

हे सुद्धा वाचा

घट्ट कव्हर टाळा

फोनमध्ये घट्ट कव्हर वापरू नये. यामुळे फोनची उष्णता बाहेर पडण्यास त्रास होऊ शकतो. जर कव्हर घट्ट असेल आणि उष्णता बाहेर पडू शकत नसेल, तर फोन खराब होऊ शकतो किंवा स्फोट होऊ शकतो. मोबाईलच्या कवरमध्ये नोट ठेवल्याने कवर आणखी घट्ट होते. परिणामी मोबाईल गरम झाल्यास कागदी नोट आग पकडण्याची शक्यता असते. यामुळे संंकटकाळी कामात येण्याच्या उद्देशाने ठेवलेली नोटच संकट काळ बनण्यापासून आपण वाचू शकते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.