Twitter Update : आता बिनधास्त करा ट्वीट ट्वीट… Twitter ने अखेर ती मर्यादा वाढवली
ट्वीटरवर आता आपल्याला कोणतेही ट्वीट करताना अक्षरांचा तुटवडा जाणवणार नाही. आता ट्वीटरची कॅरेक्टर मर्यादा वाढविल्याने आपल्या हवे ते विचार अधिक स्पष्टपणे मांडता येणार आहेत.
Twitter Character Limit Update : मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्वीटरचे मालक इलॉन मस्क जेव्हा पासून झाले आहे, तेव्हापासून ते दररोज नवनविन बदल करीत आहेत आणि ट्वीटरचे उत्पन्न वाढवित आहेत. त्यांनी मनुष्यबळात कपात, पेड सबक्रिप्शन, वर्ड लिमिटमध्ये वाढ. जाहीरात आणि सिक्युरिटी फिचर्समध्ये वाढ असे अनेक बदल गेले महिनाभरात केले आहेत. आता ट्वीटरवर एक नविन अपडेट आले आहे. ट्वीटर युजर आता 10,000 अक्षरांमध्ये ( कॅरेक्टर ) ट्वीट करू शकणार आहेत. अर्थात ही सेवा ज्यांनी ब्ल्यू टीक सेवा सब्सक्राइब केली आहे केवळ त्यांनाच मिळणार आहे.
ट्वीटरचे काय म्हणणे आहे ?
ट्वीटरने आपली कॅरेक्टर लिमिट वाढवून 10000 केली आहे. ट्वीटरवर आता युजरसाठी खास आपले ट्वीट बोल्ड करणे, किंवा इटॅलिक टेक्स्ट फॉर्मेटीक सारख्या शानदार फिचरचा समावेश करणार आहे. ट्वीटरने या बदलाची माहिती देताना सांगितले की, आम्ही ट्वीटरवर लिहिण्याचा आणि वाचण्याचा अनुभह समृद्ध करीत आहोत. आता पासून ट्वीटरवर तुमचे विचार मांडताना कॅरेक्टरची टंचाई जाणविणार नाही. त्याच पद्धतीने आपले लिखाण आता बोल्ड आणि इटॅलिक फोण्टचा वापर करता येणार आहे. ज्या लोकांना या नव्या सुविधेचा वापर करायचा आहे त्यांना आता ब्ल्यू ट्वीटर साईन करावे लागणार आहे.
हेच ते ट्वीट पाहा..
We’re making improvements to the writing and reading experience on Twitter! Starting today, Twitter now supports Tweets up to 10,000 characters in length, with bold and italic text formatting.
Sign up for Twitter Blue to access these new features, and apply to enable…
— Twitter Write (@TwitterWrite) April 14, 2023
मार्चमध्ये मिळाले होते संकेत..
इलॉन मस्क यांनी मार्च महिन्यात घोषणा केली होती की ट्वीटर आता आपल्या कॅरेक्टरची मर्यादा आता 10000 कॅरेक्टरपर्यंत वाढवणार आहे. मात्र,त्यावेळी त्यांनी हे फिचर केवळ ब्ल्यू टीक यूजरसाठीच उपलब्ध असेल असे त्यांनी सांगितले नव्हते. आता या खास फिसर्च समावेश सर्वसामान्य युजरसाठी असणार नाही असे त्यांनी त्यावेळी जाहीर केले नव्हते. यापूर्वी देखील ट्वीटरने आपल्या ट्वीट करण्याचा अनुभव बदलला होता. कंपनीने साल 2017 मध्ये आपल्या कॅरेक्टर लिमिटमध्ये 140 वरून 280 इतकी वाढ केली होती. त्यावेळी तत्कालिन सीईओ जॅक डोर्सी यांनी या निर्णयाला कंपनीसाठी छोटा बदल, परंतू युजरसाठी मोठे पाऊल असे म्हटले होते.