Facebook आता तुम्हाला ऑनलाइन फसवणुकीपासून वाचवणार, सुरु केला नवीन उपक्रम
फेसबुकची मूळ कंपनी मेटाने आपल्या युजर्ससोबत होणाऱ्या घोटाळ्यांपासून वाचवण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली असून, त्याअंतर्गत फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून होणारे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत. मेटाने आपल्या ग्लोबल कॅम्पेनच्या माध्यमातून भारतातही स्कॅम एस्केप कॅम्पेन सुरू केले आहे.
ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त अनेकजण आपल्या लोकांसाठी ऑनलाइन शॉपिंग करत आहेत. तसेच जगभरात ऑनलाईन शॉपिंग ही सुरूच असते. आजकाल ऑनलाईन पद्धतीने केले जाणाऱ्या शॉपिंगमध्ये सुद्धा अनेकदा अनेक लोकांची फसवणूक केली जाते. त्यात वाढत्या ऑनलाइन घोटाळ्यांपासून आपल्या युजर्सचे संरक्षण करण्यासाठी फेसबुकची मूळ कंपनी मेटाने घोटाळाविरोधी जनजागृती मोहीम जाहीर केली आहे, ज्यात स्कॅम फॉर इंडिया नावाच्या मोहिमेचा देखील समावेश केला आहे. फेसबुकच्या पॅरेंट कंपनीने आपल्या कॅम्पेनमध्ये काही सेलिब्रिटींचाही समावेश केला आहे, जेणेकरून लोकांची ऑनलाईन शॉपिंग दरम्यान होणारी फसवणूक टाळता येईल.
डिसेम्बर महिना सुरु झाला कि लहान मुलांना हिवाळ्याच्या सुट्ट्या सुरु होतात. त्यामुळे अनेकजण आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. बाहेर फिरायला जणांसाठी अनेकजण ऑनलाईन शॉपिंगच्या मदतीने खरेदी सुरु करतात. दरम्यान स्कॅमर्स ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या काही लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. कोणताही मेटा युजर डिजिटल फसवणुकीला बळी पडू नये. त्यामुळेच मेटाने ही मोहीम सुरू केली आहे.
ऑनलाइन फसवणूक कशी केली जाते?
येत्या २५ तारखेला ख्रिसमस हा सण संपूर्ण जगभरात मोठया उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त लोकं त्याच्या कुटुंबासाठी व आपल्या प्रियजनांसाठी भेटवस्तू हे खरेदी करतात. अश्यातच सध्या ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात शॉपिंग केली जात आहे आणि सणासुदीत कंपन्या ही भरपूर सूट देतात. दरम्यान याच गोष्टींचा फायदा घेत स्कॅमर्स बनावट ऑफर बनवून व्हिडिओ, तसेच फेक वेबसाईट्स तयार करून त्यावर आकर्षक सूट देतात. जेणेकरून लोक त्या वेबसाइट्सवर जाऊन त्यांचे ऑफर असलेल्या वस्तू पडताळून विकत घेतात. यात मात्र सामान्य लोकं ऑनलाईन पेमेंट करून वस्तू मागवतात पण कधी कधी वस्तू येतच नाही किंवा मागवलेल्या वस्तूपैकी खराब वस्तू पाठवली जाते. यामुळे लोकांचे खिसे रिकामे करण्यासाठी स्मॅकर्स हेच तपशील वापरतात.
ऑनलाइन फसवणुकीबद्दल फेसबुक सांगणार तुम्हाला
मेटाने आपल्या जगभरातील युजर्ससाठी म्हणजेच व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुक युजर्ससाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. फेसबुकच्या माध्यमातून होणारे फसवणुकीचे घोटाळे रोखण्यासाठी मेटाने फेसबुक मार्केटप्लेस सुरू केले आहे, जेणेकरून कोणत्याही स्कॅमर्सने फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास युजरला मेसेजद्वारे त्याची माहिती दिली जाईल. ‘मेटा’ने कंबोडिया, म्यानमार आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या भागातील घोटाळ्यांशी संबंधित २० लाखांहून अधिक खाती यापूर्वीच बंद केली आहेत.
ऑनलाईन स्कॅम फसवणुकीपासून रहा जागरूक
मेटा कंपनीने ऑनलाईन फसवणूक होणारे घोटाळे रोखण्यासाठी भारतात जनजागृतीकरिता बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानासोबत ‘घोटाळे टाळा’ मोहीम सुरू केली आहे. यात अभय देओलसोबत ‘ओये लकी लकी ओये’ या प्रसिद्ध गाण्याच्या रिमेकसह संबंधित कथा कथन आणि संगीताद्वारे जनजागृती केली आहे. वापरकर्त्यांना ऑनलाइन घोटाळ्यांबद्दल जागरूक करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे.