आता गुगल मॅपवरुन ट्रेनचे लाईव्ह स्टेटस पाहता येणार

अनेकदा गुगल करा म्हणजे सापडले,अस सहज म्हटलं जात. प्रवासादरम्यान रस्ता शोधण्यासाठीही अनेकजण 'गुगल मॅप्स'चा वापर घेतात. याच कारणामुळे गुगलने भारतीय लोकांसाठी लाईव्ह ट्राफिक स्टेटसचा नवा पर्याय उपलब्ध केला आहे.

आता गुगल मॅपवरुन ट्रेनचे लाईव्ह स्टेटस पाहता येणार
Follow us
| Updated on: Jun 05, 2019 | 9:30 PM

मुंबई : कुठलीही गोष्ट शोधण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे गुगल. अनेकदा गुगल करा म्हणजे सापडले,अस सहज म्हटलं जात. प्रवासादरम्यान रस्ता शोधण्यासाठीही अनेकजण ‘गुगल मॅप्स’चा वापर घेतात. याच कारणामुळे गुगलने भारतीय लोकांसाठी लाईव्ह ट्राफिक स्टेटसचा नवा पर्याय उपलब्ध केला आहे. या पर्यायाद्वारे तुम्हाला बस किंवा ट्रेनचे लाईव्ह स्टेटस पाहता येणार आहे.

गुगल मॅपने सुरु केलेल्या या फिचरच्या मदतीने युजर्सला भारतातील दहा शहरांमधील ट्राफिक कुठेही पाहता येऊ शकते. त्याशिवाय तुम्हाला ट्रेन कुठे पोहोचली आहे, ती कोणत्या स्टेशनवर आहे याचंही लाईव्ह स्टेटसही पाहता येणार आहे.  विशेष म्हणजे गुगल मॅपद्वारे आता कोणत्या रस्त्यावर जास्त ट्राफिक आहे. तुम्हाला प्रवासासाठी सर्वात चांगला मार्ग कोणता हेही पाहता येणार आहे. विशेष म्हणजे प्रवासादरम्यान तुम्ही रिक्षा, टॅक्सी, ट्रेन यांसारख्या कोणत्या सार्वजनिक वाहनाद्वारे तुम्ही लवकर पोहचू शकता हेही सांगणार आहे.

गुगल मॅप्समध्ये हा फीचर सर्वात पहिले भारतात दिले आहे.लाईव्ह ट्रेन फीचरच्या मदतीने यूजर्सला स्टेशनवर येणाऱ्या ट्रेनची वेळ समजू शकेल. तसेच त्या ट्रेनच्या वेळेतील बदल आणि उशीर झालेली वेळ दाखवण्यात येईल. या फीचरमुळे तुम्ही कोणत्याही ट्रेनची वर्तमान स्थिती पाहू शकतात. हे फीचर गुगलने Where is my train या अॅपसोबत गेल्यावर्षीच दिला होता. मात्र आता गुगलने गुगल मॅपमध्ये हे फिचर अॅड केलं आहे.

जर तुम्हालाही गुगल मॅप्स अॅपचे लाईव्ह स्टेटस पाहायचे असेल, तर सर्वाताआधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप्स अॅपचा लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल करा. इंटरनेट कनेक्शनसह तुमच्या अॅक्टिव्ह गुगल अकाऊंट अॅपमध्ये LOG IN करा.

  • तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप्स अॅप ओपन करा
  • डेस्टिनेशन ट्रेन स्टेशन किंवा लोकेशनचे नाव सर्च बारमध्ये लिहून सर्च करा. (उदाहरणार्थ, जर ट्रेन नवी दिल्लीवरुन जयपूर जात आहे. डेस्टिनेशन जयपूर स्टेशन असेल. सर्च केल्यानंतर खाली दिलेल्या डायरेक्शन बटनवर क्लिक करा.
  • यानंतर टू व्हीलर आणि वॉकच्या मध्ये ट्रेन पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा
  • आता रुट पर्याय दिसत असलेल्या ट्रेन आयकॉनवर क्लिक करा
  • येथे ट्रेनच्या नावावर टॅप करुन तुम्ही या ट्रेनचे लाईव्ह स्टेटस पाहू शकतात.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.