कारमध्ये म्युझिक सिस्टिम बसवायचीय? अवघ्या 1499 रुपयांत जबरदस्त म्युझिक सिस्टिम
कारमध्ये म्युझिक सिस्टिम बसवायचीय? अवघ्या 1499 रुपयांत जबरदस्त म्युझिक सिस्टिम (now install a modern music system in the car at an affordable price)
मुंबई : आपल्या कारमध्ये सामान्य म्युझिक सिस्टिम आहे आणि तुम्ही ती अपग्रेड करू इच्छित असाल. मात्र आपणास बजेटची चिंता सतावत आहे. मग कळजी करु नका. आता असे डिव्हाईस बाजारात उपलब्ध झाले आहे ज्याद्वारे आपण आपल्या कार स्टिरिओला वायरलेस डिव्हाईसमध्ये रूपांतरीत करू शकता आणि यासाठी आपल्याला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. (now install a modern music system in the car at an affordable price)
पोर्टेबल इक्विपमेंटसह मिळणार म्युझिक सिस्टिम
पोर्टेबल डिजिटल इक्विपमेंट्स निर्माता कंपनी पोट्रेनिक्सने शुक्रवारी कार ब्लूटूथ रिसीव्हर ‘ऑटो 12’ बाजारात आणण्याची घोषणा केली. पोट्रेनिक्सचे हे नवीन उत्पादन कार चालविताना फोन कॉल रिसिव्ह करण्यासाठी किंवा आरामदायी म्युझिक स्ट्रिमिंगसाठी खूप उपयुक्त आहे. ऑटो 12 एक -ड-ऑन ब्लूटूथ किट आहे, जे सामान्य म्युझिक सिस्टिम किंवा कार स्टिरीओला सहज वायरलेस डिव्हाईसमध्ये रूपांतरीत करू शकते. पोट्रेनिक्स ऑटो 12 5.1 ब्लूटूथ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, ज्यामुळे तुम्ही सहजरित्या आपले आवडते संगीत ऐकू शकता किंवा कॉल कनेक्ट करु शकता. कंपनीचे प्रवक्त्यांनी सांगितले की,, यात इन-बिल्ट अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन सुविधा आहे. हे संगीत आणि कॉल या दोहोंसाठी चांगली ऑडिओ क्वालिटी देते.
ऑटो 12 डिव्हाईसचे फिचर
हे डिव्हाइस व्हॉईस-असिस्टंट तंत्रज्ञानासह सज्ज आहे, जे सिरी, गुगल असिस्टंट आदींना सहजपणे सिंगल व्हॉईस कमांडसह सक्रिय करू शकते. ऑटो 12 अत्यंत पोर्टेबल आणि हलके आहे. यात एक खास बास बूस्टिंग वैशिष्ट्य आहे, जे एका बटणाच्या दाबाने सक्रिय केले जाऊ शकते. ऑडिओच्या बासला सहजतेने संतुलित करू शकता किंवा आवश्यकतेनुसार ती वाढवू किंवा कमी करू शकता. ब्लूटूथ रिसिव्हर होम स्टिरिओ-स्पीकर, कार स्टीरिओ आणि 3.5 मिमी ऑडिओ इनपुटसह हेडफोन्ससह सुलभतेने काम करते. हे आयफोन, अँड्रॉईड फोन आणि इतर सर्व स्मार्टफोनला सपोर्ट देते. पोट्रेनिक्स ऑटो 12 ची किंमत (Potrenix Auto 12 Price) एक वर्षाच्या गॅरंटीसह 1499 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हे प्रोडक्ट सर्व प्रमुख ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअरमध्ये सवलतीच्या किंमतीत उपलब्ध आहेत. (now install a modern music system in the car at an affordable price)
Fraud Alert | सावधान! अनोळखी कॉलवर सांगू नका ‘आई’चे नाव, अन्यथा होऊ शकते बँक खाते रिकामी!#FraudCall | #ALERT | #BankingAwareness | #onlinebanking https://t.co/UxSpkbYquC
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 27, 2021
इतर बातम्या
SBI मध्ये खातं असेल तर तुम्हालाही स्वस्तात पेट्रोल मिळू शकतं!
Gold Price Outlook | मार्च महिन्यात सोनं 50 हजारांचा टप्पा गाठणार? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…