Space Gas Station : अमेरिकन कंपनीचा चक्क अंतराळात पेट्रोल पंप! येथेच भरण्यात येणार सॅटेलाईट्समध्ये इंधन
Space Gas Station : आता अमेरिकन कंपनी अंतराळात पेट्रोल पंप सारखीच व्यवस्था करणार आहे. त्यामुळे मानव निर्मित उपग्रहांना तिथेच इंधन भरता येईल. जाणून घेऊयात या नवीन क्रांती विषयी
नवी दिल्ली : अमेरिकन स्टार्टअप कंपनी ऑर्बिट फॅब (Orbit Fab) अंतराळात एक मोठी घडामोड करणार आहे. तंत्रज्ञानाआधारे नवकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे हे एक क्रांतीकारक पाऊल ठरेल. मैलाचा दगडच म्हणा ना. अंतराळात चक्क पेट्रोल पंप (Petrol Pump) उभारण्यात येणार आहे. अर्थात प्रत्यक्षात हा काही पेट्रोल पंप नसणार. पण जमिनीवर जशी पेट्रोल पंपाची व्यवस्था आहे. तसेच काहीसा प्रयोग अंतराळात होऊ घातला आहे. हे एक प्रकारचे स्पेस स्टेशन, गॅस स्टेशन असेल. कंपनीचे सीईओ डॅनिअल फेबर (Daniel Faber) यांनी या महत्वकांक्षी प्रकल्पाबद्दल माहिती दिली. पृथ्वीवरुन गॅसचे टँकर भरुन अंतराळातील गॅस स्टेशनवर पोहचवले जातील. तिथून मानव निर्मित उपग्रहांना (Satelites) इंधनाचा पुरवठा करण्यात येईल.
काय होईल फायदा भविष्यात दूर दूरच्या अवकाश मोहिमांसाठी प्रवास करणाऱ्या सॅटेलाईट्सला पृथ्वीवरुन उड्डाण केल्यावर, पुन्हा रिफ्युल होत, लांबचा पल्ला गाठता येईल. अंतराळात विविध प्रयोगासाठी पाठविलेल्या, माहिती गोळा करण्यासाठी पाठविलेल्या सॅटेलाईटचा प्रवास इंधन संपले म्हणून थांबणार नाही. त्यामुळे आता मानवाला चंद्र, मंगळ, गुरु ग्रहापर्यंत मोहिमा आखता येईल. त्यांना इंधन संपल्याची भीती राहणार नाही.
तेनजिंग टँकर-001 ऑर्बिट फॅब कंपनीच्या रिफ्युलिंग स्टेशनचे नाव तेनजिंग टँकर-001 आहे. या स्टेशनचा सर्वात मोठा फायदा विविध देशांनी अंतराळात सोडलेल्या सॅटेलाईट्स होणार आहे. उपग्रहाचं इंधन संपलं तरी आता या स्टेशनच्या माध्यमातून इंधन भरता येईल. अंतराळातच ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यामुळे सॅटेलाईट पाठविण्याच्या खर्चात मोठी कपात होईल. तसेच अंतराळातील कचरा साफ करण्यासही मोठी मदत मिळेल.
US company Orbit Fab is aiming to produce “gas stations” in space.
Its CEO tells @AFP the company hopes its refueling technology will make the surging satellite industry more sustainable — and profitablehttps://t.co/6n4MugtBs2 pic.twitter.com/5yzrVxNtza
— AFP News Agency (@AFP) April 27, 2023
पृथ्वीचा फोटोही पाठविणार तेनजिंग टँकर-001 मायक्रोवेव्हच्या आकाराचा असेल. सॅटेलाईट्समध्ये इंधन भरण्यापासून हा उपग्रह पृथ्वीची छायाचित्र ही पाठवेल. वातावरण, हंगाम या संबंधीची माहिती देईल. ऑर्बिट फॅब स्वतः उपग्रहापर्यंत जाईल आणि त्यात इंधन भरेल. सॅटेलाईटमध्ये इंधन भरण्यासाठी त्या देशाला ऑर्बिट फॅबला रक्कम मोजावी लागेल. या कंपनीच्या सीईओनुसार, लवकरच हे स्टेशन उभारण्याचे काम पूर्ण होईल. हे स्टेशन मोठे असेल. यामध्ये कोणत्याही सॅटेलाईटमध्ये इंधन भरता येईल.
भविष्यात दूर दूरच्या अवकाश मोहिमांसाठी प्रवास करणाऱ्या सॅटेलाईट्सला पृथ्वीवरुन उड्डाण केल्यावर, पुन्हा रिफ्युल होत, लांबचा पल्ला गाठता येईल. अंतराळात विविध प्रयोगासाठी पाठविलेल्या, माहिती गोळा करण्यासाठी पाठविलेल्या सॅटेलाईटचा प्रवास इंधन संपले म्हणून थांबणार नाही. त्यामुळे आता मानवाला चंद्र, मंगळ, गुरु ग्रहापर्यंत मोहिमा आखता येईल. त्यांना इंधन संपल्याची भीती राहणार नाही.