आता नेटफ्लिक्सवर पहा विनामूल्य शो आणि चित्रपट, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
आपण नेटफ्लिक्स शो विनामूल्य पाहू इच्छित असाल तर netflix.com/watch-free वर क्लिक करून पाहू शकता. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण आपला आवडता चित्रपट आणि मालिका निवडू शकता आणि ते विनामूल्य पाहू शकता. (Now watch free shows and movies on Netflix, know the whole process)
नवी दिल्ली : गेल्या वर्षापर्यंत लोक ट्रायल म्हणून 30 दिवस नेटफ्लिक्सवर विनामूल्य कंटेंट पाहू शकत होते. पण अलीकडेच नेटफ्लिक्सने काही कारणामुळे विनामूल्य कंटेंट भारतातासाठी बंद केले. मात्र हे जाणून आपणास आनंद होईल की नेटफ्लिक्स पुन्हा नॉन-सब्सक्रायबर्सला काही लोकप्रिय कार्यक्रम आणि चित्रपट विनामूल्य पाहण्याची संधी देत आहे. जाणून घ्या की आपण 30 दिवसांच्या या फ्री ट्रायलचा कसा आनंद घेऊ शकता. (Now watch free shows and movies on Netflix, know the whole process)
असे पहा नेटफ्लिक्सवर फ्री शो
आपण नेटफ्लिक्स शो विनामूल्य पाहू इच्छित असाल तर netflix.com/watch-free वर क्लिक करून पाहू शकता. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण आपला आवडता चित्रपट आणि मालिका निवडू शकता आणि ते विनामूल्य पाहू शकता. जेव्हा आपण आपला आवडता शो पाहण्यासाठी सिलेक्ट कराल आपल्याला नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल आणि तेथे आपण कोणत्याही जाहिरातीशिवाय विनामूल्य कंटेंटचा आनंद घेऊ शकता.
199 रुपयाय घेऊ शकता नेटफ्लिक्सच्या प्रत्येक कंटेंटची मजा
नेटफ्लिक्सच्या प्लानची सुरुवात 199 रुपयांपासून होते, ज्यामध्ये आपण फोनवरही सर्व कंटेंट एक्सेस करू शकता. तर 499 रुपयांच्या प्लानमध्ये आपण फोन, टॅबलेट, संगणक किंवा टीव्हीवर 480p वर सामग्रीचा आनंद घेऊ शकता. याशिवाय 649 रुपयांच्या योजनेमध्ये तुम्ही फोन, टॅबलेट, संगणक आणि टीव्हीवर फुल एचडी (1080p) क्वालिटीमध्ये कंटेंट पाहू शकता. याशिवाय शेवटचा प्लान 799 रुपयांचा आहे, ज्यामध्ये आपण फोन, टॅबलेट, संगणक आणि टीव्हीवर अल्ट्रा एचडी (4K) आणि एचडीआर क्वालिटीमध्ये चित्रपट आणि मालिका पाहू शकता.
हे शो पाहू शकता विनामूल्य
प्रेक्षक नेटफ्लिक्सवर काही निवडक कार्यक्रम आणि चित्रपट विनामूल्य पाहू शकतात. या यादीमध्ये Stranger Things, Elite, Boss Baby, When They See Us, Love is Blind, Our Planet, Grace और Frankie या शोचा समावेश आहे. हे शो नेटफ्लिक्सवरील सर्वात लोकप्रिय शो आहेत आणि ते पाहण्यासाठी आपल्याला नेटफ्लिक्स खाते तयार करावे लागेल. तसेच आपण हे खाते पाहिजे तेव्हा रद्द करू शकता. (Now watch free shows and movies on Netflix, know the whole process)
मोठी बातमी ! महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणक प्रणालीवर सायबर हल्लाhttps://t.co/IXpMXQTLMk#Maharashtra #CyberAttack #IndustrialDevelopmentCorporations#Crime
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 30, 2021
AIBE XV Result 2021 : ऑल इंडिया बार एक्सामिनेशन XV चा निकाल घोषित, असा चेक करा निकाल