आता फॉलोअर्सच्या मदतीने ट्विटरवर कमवू शकता पैसे, कंपनीकडून सुपर फॉलो फिचरची घोषणा
आता फॉलोअर्सच्या मदतीने ट्विटरवर कमवू शकता पैसे, कंपनीकडून सुपर फॉलो फिचरची घोषणा (Now you can make money on Twitter with the help of followers)
मुंबई : ट्विटरने अॅनालिस्ट इव्हेंट दरम्यान अनेक नवीन वैशिष्ट्यांची घोषणा केली आहे. मायक्रो-ब्लॉगिंग साईटने सुपर फॉलो नावाची सशुल्क सदस्यता फिचरची घोषणा केली आहे. ट्विटरने महसूल वाढविण्यासाठी आपल्या सशुल्क सब्सक्रिप्शन सर्विसवर काम सुरू केले आहे. सुपर फॉलो फिचरच्या मदतीने यूजर्सला एक्सक्लुझिव्ह डिल, मासिक शुल्कावर कंटेंट मिळेल. याशिवाय ट्विटर सेफ्टी मोड फिचरवरही काम करत आहे. (Now you can make money on Twitter with the help of followers)
कंटेंट क्रिएटर्ससाठी हे फिचर फायदेशीर
या प्लॅटफॉर्मच्या मदतीने पैसे कमावू इच्छिणाऱ्या कंटेंट क्रिएटर्ससाठी ट्विटरचे सुपर फॉलो फिचर फायदेशीर आहे. ट्विटर येथे फॉलोअर्सकडून पैसे घेईल आणि त्याऐवजी त्यांना एक्सक्लुसिव्ह कंटेंट पुरवेल. यामध्ये तुम्हाला न्यूजलेटरचे सबस्क्रिप्शन आणि इतर महत्त्वपूर्ण फिचर्स देखील मिळतील. ट्विटर या सबस्क्रिप्शनसाठी दरमहा 4.99 डॉलर चार्ज घेईल. याद्वारे पब्लिशर्स सहजरित्या त्यांच्या फॉलोअर्सकडून पैसे कमवू शकतील. ट्विटरने अद्याप हे फिचर रोलआऊट केले नाही. मात्र जेव्हा हे फिचर लाँच केले जाईल, तेव्हा पब्लिशर्सना त्यांच्या फॉलोअर्सकडून थेट सपोर्ट घेण्यास या फिचरची मदत होईल. तसेच क्रिएटर्स त्यांच्या फॉलोअर्सला आवडेल असे कंटेंट देऊ शकतील.
अनेक नवी फिटर लाँच करणार ट्विटर
ट्विटर फेसबुक ग्रुपसारखे कम्युनिटीज फिचरही घेऊन येणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हे फिचर आल्यानंतर, लोक एखाद्या विषयासंदर्भात एक ग्रुप तयार करू शकतात किंवा सर्वांना आवडेल असाच कंटेंट ग्रुपपमध्ये पोस्ट करू शकतात. हे फिचर फेसबुकसारखेच असेल. म्हणजेच, जर तुम्ही एखाद्या चित्रपटाविषयी ग्रुपमध्ये बोलायचे असेल तर तुम्ही त्या ग्रुपमधील सर्व युजर्ससोबत तुमचे मत शेअर करु शकता. याशिवाय ट्विटर सेफ्टी मोडवरही काम करीत आहे. जर ट्विट हानिकारक ठरले तर ट्विटर ते त्वरित हटवेल किंवा अकाऊंट ब्लॉक करेल. (Now you can make money on Twitter with the help of followers)
28 वर्षांपूर्वी 1 वाजून 51 मिनिटांनी ‘लिटील मास्टर’ सुनील गावसकर यांना ‘या’ खेळाडूमुळे ‘जोर का झटका’, नक्की काय घडलं? https://t.co/FhpgQSc7BB
| #Cricket | #SunilGavaskar | #Gavaskar | #testcricket |
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 26, 2021
इतर बातम्या