Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लिपकार्टवर ऑफरचा धमाका, एकदम स्वस्तात मिळवा हे 3 स्मार्टफोन

Flipkart | Apple सह इतर अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन फ्लिपकार्टवर अगदी स्वस्तात खरेदीची संधी मिळत आहे. जर जुन्या स्मार्टफोनचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर बाजारातील नवीन दमदार स्मार्टफोनवर तुम्हाला जोरदार डिस्काऊंट मिळत आहे. तर चला जाणून घेऊयात कोणत्या स्मार्टफोनवर तुम्हाला सूट मिळत आहे.

फ्लिपकार्टवर ऑफरचा धमाका, एकदम स्वस्तात मिळवा हे 3 स्मार्टफोन
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 11:54 AM

नवी दिल्ली | 16 जानेवारी 2024 : नवीन स्मार्टफोन स्वस्तात मिळवायचा असेल तर फ्लिपकार्टवर तुम्हाला मोठी सूट मिळत आहे. जुन्या स्मार्टफोनचा कंटाळा आला असेल तर नवीन स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची फ्लिपकार्टवर संधी मिळाली आहे. कॅमरा, रॅम , बॅटरी आणि आता किंमत पण आकर्षक असल्याने तुम्ही या ऑफरकडे दुर्लक्ष करु शकणार नाहीत. फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल सुरु आहे. या सेलमध्ये ग्राहकांना नामवंत स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन, शाओमी रेडमी स्मार्टफोन मोठ्या सवलतीत मिळत आहे. कोणते आहेत हे मोबाईल आणि किती मिळत आहे त्यांच्यावर डिस्काऊंट?

  1. iPhone 15 : Apple iPhone 15 चे वेड कमी नाही. अनेक जण या स्मार्टफोनसाठी आग्रही आहेत. पण बजेटमुळे त्यांनी हा स्मार्टफोन खरेदी केलेला नाही. सध्या हा स्मार्टफोन 79,900 रुपयांना आहे. तर फ्लिपकार्टवर 17% सवलतीसह तो खरेदी करता येणार आहे. त्यामुळे Apple iPhone 15 ग्राहकांना 65,999 रुपयांना मिळेल. म्हणजे ग्राहकांना फ्लिपकार्टवरुन हा स्मार्टफोन खरेदी केल्यास 13,901 रुपयांची सूट मिळेल. तर एक्सचेंज ऑफरवर हा स्मार्टफोन 54,990 रुपयांना मिळेल. त्यामुळे ग्राहकांना बंपर सूट मिळेल.
  2. Redmi Note 13 Pro+ : कंपनीने या नवीन स्मार्टफोन Redmi Note 13 Pro+ चा 8GB RAM/256GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर स्वस्तात मिळतो. ऑफरमध्ये 31,999 रुपयांना हा स्मार्टफोन मिळेल. जर तुम्ही ICICI बँकेच्या कार्डचा वापर करणार असाल तर तुम्हाला झटपट 2,000 रुपयांची सूट मिळेल. तर काही मॉडेलवर ग्राहकांना एक्सचेंज ऑफरमध्ये या मोबाईलवर 2,000 रुपयांची सूट मिळेल.
  3. iPhone 14 : या आयफोनची किंमत 69,900 रुपये आहे. पण फ्लिपकार्टवर 17% सवलतीसह तो उपलब्ध आहे. ग्राहकांना 11,901 रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 57,999 रुपयांना मिळेल. तर एक्सचेंज ऑफरवर हा स्मार्टफोन अजून स्वस्तात मिळेल. त्यांना या सवलतीसह हा स्मार्टफोन 54,990 रुपयांपर्यंत मिळेल. फ्लिककार्टसह इतर ऑनलॉईन कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पण डिस्काऊंट मिळत आहे. तिथे पण सेल सुरु आहे. ग्राहकांनी सर्व प्लॅटफॉर्मवर किंमती तपासाव्यात. त्यानंतर जिथे अधिक डिस्काऊंट असेल तिथून स्मार्टफोन खरेदी करावा.
हे सुद्धा वाचा
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.