Smartphone : जुना मोबाईल सोन्याहून सुद्धा पिवळा; या खास वस्तूमुळे फायदाच फायदा
Gold in Smartphone : तुम्ही सुद्धा जुन्या मोबाईलला ई-कचरा म्हणून फेकण्याची चूक तर करत नाहीत ना? कारण जुना मोबाईल मधील हा पदार्थ सोन्यासारखाच मौल्यवान आहे. त्याचा फायदा स्क्रॅपवाल्यांना होतो. कोणता आहे हा धातु, कसा होतो त्याचा वापर? जाणून घ्या एका क्लिकवर
स्मार्टफोनचं वेड तर आता सर्वांनाच आहे. सोशल मीडियाचं पीक वाढल्यापासून प्रत्येकाला नवाकोरा स्मार्टफोन मिरवण्याची कोण हौस लागली आहे. अनेक जण लेटेस्ट मॉडलच्या नादात जुना स्मार्टफोन मातीमोल किंमतीत विकतात. अनेक जणांना स्मार्टफोन शिवाय करमत नाही. पण त्यांना त्यांच्याकडील स्मार्टफोनमध्ये बहुमूल्य असे धातु असतात याची माहितीच नाही. नवीन स्मार्टफोन घेण्यापूर्वी एकदा जुन्या मोबाईलमध्ये कोणता धातु असतो, त्याचा काय वापर होतो, हे समजून घ्या.
अनेक बेशकिंमती धातुचा वापर
तुम्हाला आता या धातुचीं नावं वाचली तर धक्का बसेल. भंगारमध्ये विक्री झालेल्या स्मार्टफोनमध्ये सुद्धा बेशकिंमती धातुत असतात हे अनेकांच्या गावी सुद्धा नसते. काही दिवसांपूर्वीच्या एका वृत्तानुसार, आयफोनमध्ये तर चांदी, सोने, प्लॅटेनियम, कांस्य आणि प्लॅटेनियमचा वापर करतात. आपण कचरा म्हणून स्वस्तात स्मार्टफोन भंगारवाले अथवा दुरुस्ती करणाऱ्याला देतो. पण त्यातील काही महागड्या स्मार्टफोनमध्ये महागड्या धातुचा वापर झालेला असतो. काळानुसार त्याची गुणवत्ता कायम असते आणि किंमतही वाढलेली असते.
आयफोनमध्ये असते तरी काय?
एका दाव्यानुसार, आयफोनमध्ये जवळपास 0.34 ग्रॅम चांदी, 0.034 ग्रॅम सोने, 15 ग्रॅम तांबे, 0.015 ग्रॅम प्लॅटेनियम आणि 25 ग्रॅम ॲल्युमिनियमचा वापर करण्यात येतो. स्मार्टफोन तयार करताना केवळ प्लास्टिकचाच वापर होतो असे नाही तर त्याशिवाय काच सुद्धा वापरण्यात येते. तर इतरीही काही महत्त्वाच्या गोष्टींचा वापर होतो. अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा यात वापर होतो. मोबाईल खराब झाल्यावर सुद्धा त्यातील काही कॉपोनंट्स चांगले असतात. त्याचा पुनर्वापर करण्यात येतो.
एका संशोधनानुसार, 10 लाख फोनमधून जवळपास 34 किलो सोने, 350 किलो चांदी, 16 टन तांबे, आणि 15 किलो पॅलेटिनम काढण्यात येते. पण बाजारातील 10 स्मार्टफोनमधूनच या किंमती वस्तू अगोदर काढण्यात येतात. पण ज्यावेळी हे स्मार्टफोन प्रक्रियेसाठी फॅक्टरीत जातात त्यावेळी हा खजिना तिथे काढून घेण्यात येतो.
पण तुम्ही घरी या वस्तू काढू शकत नाही. त्यातच स्मार्टफोनमधून सोने शोधणे आणि ते काढणे हे जिकरीचे काम आहे. हे काम तुम्ही घरबसल्या करू शकत नाही. या क्षेत्रातील निष्णात व्यक्तीलाच स्मार्टफोनमध्ये या धातुचा कुठे वापर होतो आणि ते कसे काढण्यात येतात हे माहिती असते.