OnePlus चा फोन पाहिला असेल, आता हा हायफाय टीव्ही पाहा
स्मार्टफोन कंपन्यामधील प्रसिद्ध OnePlus या ब्रँडने नवीन स्मार्ट TV लाँच करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या कंपनीने एक ब्लॉग पोस्टमध्ये याबाबतची माहिती दिली आहे.
मुंबई : स्मार्टफोन कंपन्यामधील प्रसिद्ध OnePlus या ब्रँडने नवीन स्मार्ट TV लाँच करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या कंपनीने एक ब्लॉग पोस्टमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. गेल्यावर्षी कंपनीचे सीईओ पीट लॉऊ यांनी या टीव्हीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. या टीव्हीचा लोगो लाँच करण्यात आला असला तरी अद्याप याचे नाव काय असणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
OnePlus टीव्हीच्या सीरीजचे नाव ‘OnePlus TV’ असे ठरवण्यात आले आहे. या टीव्हीच्या नावासाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. ‘OnePlus TV: You Name It’ असे नाव या स्पर्धेला देण्यात आलं होतं. कंपनीच्या सीईओ लॉऊ यांनी दिलेल्या माहितीनुसार, born out of the, Never Settle आणि spirit असू शकते. येत्या सप्टेंबर महिन्यात OnePlus टीव्ही लाँच होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
OnePlus ने आपल्या ब्रँडला टीव्हीसोबत जोडले आहे. त्यामुळे स्मार्टफोनप्रमाणे या टीव्हीचाही लोगोही सेम आहे. मात्र याची किंमत नेमकी किती असणार याबाबत कोणतीही माहिती कंपनीने दिलेली नाही.
The community spoke, and we made it happen. The OnePlus TV now has a logo. Read about our inspiration behind this design ? https://t.co/XpyfLIzTYV
More details on OnePlus TV coming soon. Stay tuned pic.twitter.com/m1Dk3o6Gak
— OnePlus India (@OnePlus_IN) August 14, 2019
OnePlus TV चे काही फिचर्स
OnePlus TV हा चार स्क्रीन साईजमध्ये उपलब्ध होणार आहे. 43 इंच, 55 इंच, 65 इंच आणि 75 इंच या चार स्क्रीन साईज OnePlus TV मध्ये असणार आहे. हा एक अँड्राईड टीव्ही असणार आहे. पण यात OxygenOS मिळणार का याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्याशिवाय या टीव्हीमध्ये Bluetooth 5.0 आणि 4K HDR डिस्प्ले आहे. विशेष म्हणजे यातील कोणत्याही एका मॉडेलमध्ये OLED पॅनल दिला जाणार आहे.
हा टीव्ही सप्टेंबर महिन्याच्या शेवटी लाँच होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारतात OnePlus TV हा Amazon India या वेबसाईटवर लाँच करण्यात येईल असं म्हटलं जातं आहे.