16GB RAM सह OnePlus बाजारात ठरला पुष्पा; या दमदार स्मार्टफोनचे फीचर्स तरी काय?
OnePlus 13 5G Smartphone : वनप्लस कंपनी बहुप्रतिक्षित स्मार्टफोन OnePlus 13 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स साईट ॲमेझॉनवर लाँच करण्यात येणार आहे. कंपनने अगोदरच हा स्मार्टफोन बाजारात आणण्याची घोषणा केली होती.
स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लस (OnePlus) लवकरच बहुप्रतिक्षित स्मार्टफोन OnePlus 13 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स साईट ॲमेझॉनवर लाँच करण्यात येणार आहे. कंपनने अगोदरच हा स्मार्टफोन बाजारात आणण्याची घोषणा केली होती. Amazon वर या स्मार्टफोनचा मायक्रो साईट लाईव्ह करण्यात आले आहे. या साईट कॉमर्स साईटवर फोनचे फीचर्स आणि “कमिंग सून” चे टॅग दिसत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन लवकरच बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे.
Amazon वर वनप्लस 13 चे माइक्रो साईट लाईव्ह
वनप्लस 13 साठी Amazon वर एक उत्पादन पेज तयार करण्यात आले आहे. या पेजवर स्मार्टफोनची छायाचित्र आणि फीचर्स शेअर करण्यात आले आहे. यामध्ये OxygenOS 15 आणि AI फीचर्सचा उल्लखे करण्यात आला आहे. तर या सर्व घडामोडींमुळे हा फोन ॲमेझॉनवर लाँच करण्यात येणार आहे हे स्पष्ट आहे.
OnePlus 13 Specifications
हा स्मार्टफोन अँड्रॉईड 15 पर आधारीत OxygenOS 15 वर काम करेल. यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचा क्लॉक स्पीड 4.32GHz पर्यंत आहे. ग्राफिक्ससाठी यामध्ये Adreno 830 GPU चा वापर करण्यात आला आहे.
मेमरी आणि स्टोरेज
वनप्लस 13 चे विविध व्हेरिएंट्स आहेत. त्यात 12GB, 16GB आणि 24GB रॅमचा पर्याय हा चीनमध्ये देण्यात आला आहे. भारतात हा पर्याय 16GB पर्यंत आहे. यामध्ये LPDDR5X RAM आणि 512GB पर्यंतचे UFS 4.0 स्टोरेज असण्याची शक्यता आहे.
वनप्लस 13 चे डिस्प्ले
वनप्लस 13 मध्ये 6.82-इंचाची 2K+ रिजोल्यूशनचा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेट आणि 4500nits पीक ब्राईटनेस आणि Dolby Vision सह असेल.
कॅमेरा सेटअप कसा?
OnePlus 13 5G Smartphone च्या चीनमधील व्हर्जनमध्ये Hasselblad-ट्यून ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. या मोबाईलमध्ये 50MP चा मुख्य OIS सेन्सर, 50MP चा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 50MP चा पेरीस्कोप टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आणला आहे.
वनपल्सची बॅटरी आणि चार्जिंग
हा स्मार्टफोन 6,000mAh ची ड्युअल सेल बॅटरीसह येतो. ही बॅटरी 100W च्या SuperVOOC फास्ट चार्जिंग आणि 50W च्या वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येईल. या स्मार्टफोनची लाँचिंग डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही. पण हा स्मार्टफोन जानेवारी 2025 च्या तिसर्या आठवड्यात विक्रीला येईल.