OnePlus 13 स्मार्टफोनचा नवा विक्रम, पाहा काही अनोखे फिचर्स

वनप्लस कंपनीने त्याचा नवा OnePlus 13 हा स्मार्टफोन चीनमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी लाँच केला होता, लाँचिंगनंतर हा स्मार्टफोन घेण्यासाठी अनेक स्मार्टफोन चाहत्यांची गर्दी झाली होती.

OnePlus 13 स्मार्टफोनचा नवा विक्रम, पाहा काही अनोखे फिचर्स
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 1:13 PM

वनप्लस कंपनीने त्याचा नवा OnePlus 13 हा स्मार्टफोन चीनमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी लाँच केला होता. लाँचिंगनंतर हा स्मार्टफोन घेण्यासाठी अनेक स्मार्टफोन चाहत्यांची गर्दी झाली होती. बघता बघता ३० मिनिटात पहिल्या सेलमध्ये १ लाखांहून अधिक स्मार्टफोनची विक्री करण्यात आली. एका पत्रकार परिषदेत वनप्लस चीनचे अध्यक्ष ली जी यांनी वनप्लस १३ च्या पहिल्या सेलची आकडेवारी जाहीर केली. जो वनप्लस फ्लॅगशिपसाठी एक विक्रमी बाब ठरली आहे. हा स्मार्टफोन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये बाजारात उपलब्ध करण्यात आला आहे.

OnePlus 13 किंमत

रॅम आणि स्टोरेज मेमरीनुसार हा स्मार्टफोन ४ मॉडेल्समध्ये बाजारात उपलब्ध आहे. त्यानुसार त्याची किंमतही वेगवेगळी आहे. जी खालीलप्रमाणे आहे:-

वनप्लस १३ (१२ जीबी + २५६ जीबी) ची किंमत ४, ४९९ चीनी युआन म्हणजेच भारतात ५३, १०० रुपये इतकी आहे.

वनप्लस १३ (१२ जीबी + ५१२ जीबी) ची किंमत ४,८९९युआन (सुमारे ५७,९०० रुपये) इतका आहे.

वनप्लस १३ (१६ जीबी + २५६ जीबी) ची किंमत ५,२९९युआन (सुमारे ६२,६०० रुपये) आहे.

वनप्लस १३ (२४ जीबी + १ टीबी) ची किंमत ५,९९९युआन (सुमारे ७०,९०० रुपये) आहे. हे या स्मार्टफोनचे टॉप मॉडेल आहे.

कंपनीने हे स्मार्टफोन ब्लू (लेदर), ऑब्सिडियन (ग्लास) आणि व्हाईट (ग्लास) रंगात लाँच केले आहेत. लवकरच तो भारतातही लाँच केला जाऊ शकतो.

OnePlus 13 स्पेसिफिकेशन्स

हा स्मार्टफोन अँड्रॉइड १५ वर आधारित कलर ओएएस १५ वर चालतो. तसेच स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिप आणि एड्रेनो ८३० जीपीयू आहे. याच्या डिस्प्लेमध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

वनप्लस १३ मध्ये १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह ६.८२ इंचाचा क्वाड एचडी प्लस (१४४० बाय ३१६८ पिक्सल) एलटीपीओ एमोलेड डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम (नॅनो+नॅनो) सपोर्ट सिस्टिम देण्यात आला आहे.

यात ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि चार मायक्रोफोन आहेत. तसेच कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ५ जी, ४ जी एलटीई, वाय-फाय ६ आणि ब्लूटूथ ५.४ एनएफसी, ड्युअल बँड जीपीएस आणि यूएसबी ३.२ जेन १ टाइप सी पोर्ट चा समावेश केला गेला आहे.

OnePlus 13 कॅमेरा आणि बॅटरी

वनप्लस १३ मध्ये उत्तम फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याला हॅसेलब्लाड ने ट्यून केले आहे. रियर कॅमेऱ्यात ओआयएस आणि एफ / १.६ अपर्चर सह ५० एमपी प्रायमरी कॅमेरा, एफ / २.२अपर्चर सह ५० एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा आणि ओआयएस आणि एफ / २.६ सह ५० एमपी पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आहे. फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सेलचा एफ/२.४ अपर्चर कॅमेरा आहे.

स्मार्टफोनमध्ये १०० वॉट फ्लॅश चार्ज (वायर्ड) आणि ५० वॉट फ्लॅश चार्ज (वायरलेस) सपोर्टसह ६००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. फोन रिव्हर्स वायर्ड (५वॉट) आणि रिव्हर्स वायरलेस (१० वॉट) चार्जिंगला सपोर्ट करतो. दमदार फीचर्स देणारा हा एक पॉवरफुल स्मार्टफोन आहे, जो तुम्ही लवकरच भारतीय बाजारात पाहू शकता.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.