जबरदस्त कॅमेरा, 256GB स्टोरेजसह OnePlus 9 आणि 9 Pro बाजारात, किंमती…

चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी वनप्लसने (OnePlus) त्यांची लेटेस्ट OnePlus 9 Series लाँच केली आहे. (OnePlus 9 and OnePlus 9 Pro launched)

जबरदस्त कॅमेरा, 256GB स्टोरेजसह OnePlus 9 आणि 9 Pro बाजारात, किंमती...
OnePlus 9 and OnePlus 9 Pro
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 11:48 AM

मुंबई : चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी वनप्लसने (OnePlus) त्यांची लेटेस्ट OnePlus 9 Series लाँच केली आहे. या  सिरीजमधील वनप्लस 9, वनप्लस 9 प्रो आणि वनप्लस 9 आर हे तीन फोन लाँच केले आहेत. या स्मार्टफोनमधील महत्त्वाचे फीचर म्हणजे त्याचा कॅमेरा. वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो या स्मार्टफोनसोबत ग्राहकांना जबरदस्त कॅमेरा एक्सपीरियन्स देण्यासाठी कंपनीने Hasselblad सोबत हात हातमिळवणी करत शानदार कॅमेरा डिझाईन केला आहे. (OnePlus 9 and OnePlus 9 Pro launched in india, check price, specs and features)

वनप्लस 9 प्रो स्नॅपड्रॅगन 888, QHD+ डिस्प्ले LPTO टेक, 65W फास्ट चार्जिंग, क्वाड कॅमेरा आणि इतर फीचर्स सारख्या टॉप एंड फीचर्ससह सादर करण्यात आला आहे, तर वनप्लस 9 च्या ग्राहकांना यापेक्षा कमी फीचर्स मिळतील. वनप्लस 9 प्रो मध्ये तीन कलर ऑप्शन्स आहेत ज्यात Morning Mist, Pine Green आणि Stellar Black या रंगांचा समावेश आहे. तर वनप्लस 9 मध्ये तीन कलर ऑप्शन्स आहेत ज्यात Winter Mist, Arctic Sky आणि Astral Black हे रंग आहेत.

OnePlus 9 चे फीचर्स

हे स्मार्टफोन अँड्रॉयड 11 वर आधारित ऑक्सीजन ओएस 11 वर काम चालता. वनप्लस 9 मध्ये ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस (1,080×2,400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेश्यो 20.9 आहे. रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज दिला आहे. वनप्लस 9 मध्ये स्पीड आणि मल्टिटास्कींगसाठी कंपनीने स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरचा वापर केला आहे. फोनमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटर्नल स्टोरेज स्पेस दिली आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज स्पेस वाढवता येईल. फोनमध्ये मल्टी लेयर कुलिंग सिस्टम दिली आहे. वनप्लस 9 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 48 मेगापिक्सलचा Sony IMX689 प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. सोबत 50 मेगापिक्सल चा अल्ट्रा वाइड कॅमेरा Sony IMX766 सेंसर आणि 2 मेगापिक्सल मोनोक्रोम कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.

कसा आहे OnePlus 9 Pro?

OnePlus 9 Pro या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम दिले आहे. 256 जीबी पर्यंतची इंटर्नल स्टोरेज स्पेस दिली आहे. या फोनमध्ये बॅक पॅनेलला क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. 48MP Sony IMX789 प्रायमरी कॅमेरा सेंसर, सोबत 50MP Sony IMX766 सेकेंडरी कॅमेरा सेंसर दिला आहे. जो अल्ट्रा-वाइड फ्रीफॉर्म लेंस सोबत येतो. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा दिला आहे. 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनचे खास फीचर्स म्हणजे यात ग्राहकांना Hasselblad Pro Mode मिळणार आहे. यामध्ये पॉवरसाठी 4500 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. जी Warp चार्ज 65T सह येते. तसेच 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. अवघ्या 29 मिनिटात या फोनची बॅटरी पूर्ण चार्ज होते.

वनप्लस 9 आणि 9 प्रो च्या भारतातील किंमती

भारतात वनप्लस 9 ची किंमत 49,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या किंमतीत आपल्याला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस मिळते. त्याचबरोबर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 54,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. वनप्लस 9 प्रो ची सुरुवातीची किंमत 64.999 रुपये इतकी आहे, ज्यामध्ये आपल्याला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस मिळते. तर त्याच वेळी टॉप व्हेरिएंट म्हणजेच 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 69,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

सर्व स्मार्टफोन ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनेलद्वारे खरेदी केले जाऊ शकतात. वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो अमेझॉन इंडिया आणि वनप्लस 9 ऑनलाईन स्टोअर वरून खरेदी करता येतील. वनप्लसने भारतीय बाजारपेठेसाठी वनप्लस 9 आर देखील बाजारात सादर केला आहे. यासह कंपनीने वनप्लस वॉच देखील लाँच केलं आहे.

इतर बातम्या

दमदार कॅमेरा असलेल्या Vivo X60 series ची किंमत लीक, जाणून घ्या फीचर्स

मोबाईल फुटला, डिस्प्ले गेला, डोन्ट वरी, हा 7 हजाराचा स्मार्टफोन घ्या आणि निश्चिंत राहा

48MP कॅमेरावाला नवीन Redmi Note 10 अवघ्या 11,999 रुपयात खरेदी करण्याची संधी

(OnePlus 9 and OnePlus 9 Pro launched in india, check price, specs and features)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.