OnePlus 9 चे स्पेसिफिकेशन्स लीक, दमदार कॅमेरा, डिस्प्ले आणि बॅटरी बॅकअप, जाणून घ्या सर्वकाही

स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लस मार्च 2021 मध्ये त्यांची प्रमुख फ्लॅगशिप वनप्लस सिरीज घेऊन येणार आहे. (OnePlus 9 specification leak)

OnePlus 9 चे स्पेसिफिकेशन्स लीक, दमदार कॅमेरा, डिस्प्ले आणि बॅटरी बॅकअप, जाणून घ्या सर्वकाही
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 2:15 PM

मुंबई : टेक्नोलॉजीप्रेमींसाठी एक नवीन डिव्हाइस लॉन्च केलं जाणार असल्याच्या बातम्यांना वेग आला आहे. अशी अपेक्षा आहे की, स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लस मार्च 2021 मध्ये त्यांची प्रमुख फ्लॅगशिप वनप्लस सिरीज घेऊन येणार आहे. लाँचिंग जसजसं जवळ येत आहे तसतशी या नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोनबद्दलची काही माहिती समोर येत आहे. दरम्यान, एका टिपस्टरने वनप्लसच्या नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोनबद्दलचे काही स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. हे स्क्रीनशॉट सूचित करतायत की वनप्लस कंपनी लवकरच वनप्लस 9 (OnePlus 9) हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. (OnePlus 9 specification leak know display charging and camera sensor details)

नुकत्याच लीक झालेल्या माहितीनुसार वनप्लस 9 स्नॅपड्रॅगन 888 SoC द्वारे चालणारा स्मार्टफोन असेल. यामध्ये OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro, OnePlus 9 Lite चा समावेश आहे. टिपस्टर TechDroider द्वारे मिळालेल्या माहितीनुसार वनप्लस 9 मध्ये एक 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 402 पीपीआय पिक्सेल डेन्सिटीसह 6.55 इंचांचा फुल-एचडी + (1080 x 2400 पिक्सेल) डिस्प्ले (Full HD+ Display) दिला जाण्याची शक्यता आहे.

स्मार्टफोन बनवणारी चिनी कंपनी वनप्लस 9 हा स्मार्टफोन दोन स्टोरेज वेरियंटसह सादर करणार आहे. यामधील एक वेरियंट 8GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेजसह सादर केलं जाईल. तर दुसरं वेरियंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज स्पेससह सादर केलं जाण्याची शक्यता आहे. लीक्समधील माहितीनुसार वनप्लस 9 फोनमध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि सेकेंडरी कॅमेरा म्हणून 48MP चा सेंसर आणि 8MP टर्शरी सेंसर दिला जाईल. सोबतच फोनमध्ये OIS सपोर्टसह 12 मेगापिेक्सलचा टेलिफोटो कॅमेरा दिला जाऊ शकतो. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC आणि अॅड्रेनो 660 GPU द्वारे संचालित या फोनमध्ये एक पावरफुल 4,500mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.

OnePlus 9 स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये चार्जरसह 8K रेकॉर्डिंग आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी बॅटरी दिली जाणार आहे. तसेच हा फोन 30W फास्ट वायरलेस चार्जिंग सपोर्टसह सादर केला जाणार आहे. अनेक लीक्स आणि रिपोर्ट्समध्ये OnePlus 9 स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत विविध दावे केले जात आहेत. दरम्यान, या फोनच्या लाँचिंगबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

इतर बातम्या

5000mAh बॅटरी, 6.5 इंच डिस्प्ले, किंमत अवघी 7499, Moto चा दमदार स्मार्टफोन लाँच

6.5 इंच डिस्प्ले, 5000mAh बॅटरी आणि किंमत खूपच कमी, Moto स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

5000 हून कमी आहे सॅमसंग आणि Nokia च्या धमाकेदार फोनची किंमत, मिळणार जबरदस्त फीचर्स

4GB/64GB, ट्रिपल कॅमेरासह दमदार फीचर्स, Nokia चा बजेट फोन बाजारात

(OnePlus 9 specification leak know display charging and camera sensor details)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.