OnePlus चा 5G फोन तब्बल 15 हजार रुपयांनी स्वस्त, काय आहे डील जाणून घ्या…..

OnePlus 10R 5G खरेदीवर युजर्सना ॲमेझोनवर खूप डिस्काउंट ऑफर मिळत आहे. या फोनमध्ये 80W चा वेगवान चार्जर आणि 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. अधिक जाणून घ्या..

OnePlus चा 5G फोन तब्बल 15 हजार रुपयांनी स्वस्त, काय आहे डील जाणून घ्या.....
oneplus 10r 5gImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 6:35 PM

मुंबई : वनप्लसने (OnePlus) या वर्षाच्या सुरुवातीला वनप्लस 10 सीरिज बाजारात आणली होती आणि आता त्या सीरिजचा फोन 15750 रुपयांनी स्वस्तात (cheaper) खरेदी करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ॲमेझोनवर लिस्टेड असलेल्या या फोनचे नाव वनप्लस 10 आर 5जी (OnePlus 10R 5G) असे आहे.हा अपकमिंग फोन ॲमेझॉनवर लिस्टेड असून त्याठिकाणी संपूर्ण डीलची माहिती देण्यात आली आहे. लिस्टेड माहितीनुसार हा फोन 34999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. पण जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल, आणि तो तुम्हाला एक्सचेंज करायचा असेल तर त्यावर 15750 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यानंतर तुम्ही फक्त 19249 रुपयांना हा नवीन स्मार्टफोन खरेदी करु शकणार आहात.

हायलाईट्स

  1. OnePlus 10R 5G मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल
  2. या फोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो
  3. 15750 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यानंतर तुम्ही फक्त 19249 रुपयांना हा नवीन स्मार्टफोन खरेदी करु शकणार आहात.
  4. हे 2400 X 1080 रिझोल्युशनसह येते
  5. OnePlus 10R 5जीला दमदार प्रोसेसर देण्यात आले असून ते MediaTek D8100 Max चिपसेटसह ग्राहकांना उपलब्ध होईल

काय आहे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 10R 5G मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. यासोबतच यामध्ये आयरिश डिस्प्ले देण्यात आला आहे. हे 2400 X 1080 रिझोल्युशनसह येते. डिस्प्लेच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात हायपर टच मोड, रीडिंग मोड, नाईट मोड आणि आय कम्फर्ट मोड आदींचा समावेश आहे.

OnePlus 10R 5G प्रोसेसर आणि रॅम

OnePlus 10R 5जीला दमदार प्रोसेसर देण्यात आले असून ते MediaTek D8100 Max चिपसेटसह ग्राहकांना उपलब्ध होईल. तसेच, यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा फोन 5000 mAh बॅटरीसह येतो, ज्याला चार्जिंगसाठी 80 वॉट फास्ट चार्जर देखील मिळतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि हायपर बूस्ट गेमिंग इंजिन आहे.

कॅमेरा सेटअप

OnePlus 10R 5G च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, जो Sony IMX766 सेंसरसह येतो. यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.