बाजारात Oneplus करणार धमाका; दमदार स्मार्टफोनची जोरदार चर्चा, फोटो पण झाला लिक, तुम्ही पाहिलात का?

Oneplus Nord 4 : OnePlus ने 16 जुलै रोजी समर लाँच इव्हेंटची घोषणा केली आहे. तर सोबतच 'Nord' नावाने फोटो पण शेअर केला आहे. कंपनीने त्यांच्या Nord मालिकेतील नवीन दमदार स्मार्टफोन OnePlus Nord 4 बाजारात उतरविण्याची तयारी केली आहे. कसा आहे हा स्मार्टफोन?

बाजारात Oneplus करणार धमाका; दमदार स्मार्टफोनची जोरदार चर्चा, फोटो पण झाला लिक, तुम्ही पाहिलात का?
वनप्लसचा नवीन दमदार स्मार्टफोन लवकरच बाजारात
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 10:16 AM

OnePlus Nord 4 भारतासह जगात 16 जुलै रोजी लाँच होईल. OnePlus समर लाँच इव्हेंटमध्ये तो सादर करण्याची शक्यता आहे. त्यासाठी कंपनीने ‘Nord’ नावाने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो OnePlus Nord 4 चा असल्याचा दावा करण्यात येत आहे. Nord मालिकेत कंपनी Lite आणि CE मॉडल घेऊन आलेली आहे. आता नवीन मॉडेल ग्राहकांसाठी बाजारात येत आहे. काय आहे या स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये आणि काय आहे किंमत, जाणून घ्या?

काय आहे दावा

हाती आलेल्या माहितीनुसार, टिपस्टर संजू चौधरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधीची माहिती दिली आहे. त्यानुसार, OnePlus Nord 4 मेटल आणि ग्लासच्या डिझाईनपासून तयार होईल. लीक झालेल्या छायाचित्रात या फोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरा दिसत आहेत. कॅमेरे एकाच रेषेत आणि जवळ असल्याने फोनमधील डिझाईन युनिक असल्याचा दावा करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहेत वैशिष्ट्ये

डिझाईन : मेटल आणि ग्लासचे डिझाईन

डिस्प्ले : 6.74-इंचचा OLED डिस्प्ले, 1.5K रिझॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2150nits पीक ब्राईटनेस

प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 चिप

बॅटरी : 5,500mAh ची बॅटरी असेल ती 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल

ऑपरेटिंग सिस्टम : Android 14 (3 वर्षांचे OS अपडेट आणि 4 वर्षांचे सुरक्षा कवच )

कॅमेरा असेल कसा?

OnePlus Nord 4 च्या मागील बाजूस दोन कॅमेरे असतील. मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल तर दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये समोरील बाजूस 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात येईल.

OnePlus Nord 4 मध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि ड्युअल स्पीकर असतील. स्क्रीनला टच केल्यावर तो अनलॉक होईल. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.4, एनएफसी आणि आयआर ब्लास्टर असेल. दमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे ग्राहकांना फायदा होईल.

OnePlus Nord 4 : किती असेल किंमत?

टिप्सटर नुसार, OnePlus Nord 4 ची सुरुवातीची किंमत 31,999 रुपये असू शकते. Nord CE 4 Lite 20,000 रुपयांपेक्षा कमी तर Nord CE 4 हा स्मार्टफोन 30,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीला विक्री झाला होता. . Nord 3 ला 33,999 रुपयांत उपलब्ध करुन देण्यात आला. त्यामुळे OnePlus Nord 4 हा 35,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असेल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.