OnePlus Pad : वनप्लस पॅड लाँच होण्याआधीच माहिती लीक, जाणून घ्या फीचर्स

वनप्लस पॅडचे कोडनेम Reeves आहे आणि ते 2022 च्या पहिल्या सहामाहीत लाँच केला जाऊ शकतो. त्यामुळे आता लवकरच हा वनप्लस पॅड लाँच होण्याची शक्यता आहे.

OnePlus Pad : वनप्लस पॅड लाँच होण्याआधीच माहिती लीक, जाणून घ्या फीचर्स
लवकरच येणार वनप्लस पॅडImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 11:43 AM

मुंबई : वनप्लस (OnePlus) त्याच्या पहिल्या टॅबलेटवर (tablet) काम करत आहे. त्याला OnePlus पॅड (Pad) म्हटलं जाऊ शकतं . Xiaomi Pad 5 प्रमाणेच हा एक उच्च श्रेणीचा टॅबलेट आहे. वनप्लस पॅडची सध्या चाचणी सुरू आहे. कंपनी यात येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींवर काम करत आहे. ग्राहकांना कसलीही अडचण न येता हा वनप्लस पॅड वापरता यावा, यासाठी प्रयत्न केले जातायेत. तुम्हाला माहिती असेल की चाचणी टप्प्यात देखील वापरल्या जाणार्‍या उत्पादनांना एक सांकेतिक नाव दिलं जातं. वनप्लस पॅडसाठीही हेच समोर आलं आहे. एका अहवालानुसार, वनप्लस पॅडचे कोडनेम Reeves आहे आणि ते 2022 च्या पहिल्या सहामाहीत लाँच केला जाऊ शकतो. त्यामुळे आता लवकरच हा वनप्लस पॅड लाँच होण्याची शक्यता आहे. ही बातमी ऐकुण वनप्लस आवडणाऱ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पण हे खरं आहे. लवकरच त्याची तारीख समोर होण्याची शक्यता आहे.

एका रिपोर्टनुसार वनप्लस पॅडच्या वैशिष्ट्यांबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण वनप्लस पॅडची चाचणी सुरू असल्याचं समजलं आहे. वनप्लस पॅड हा प्रीमियम टॅबलेट असेल असं नुकतंच कळवण्यात आलंय.

OnePlus पॅड आकाराने मोठा

12.4-इंच OLED स्क्रीनसह OnePlus पॅड आकाराने मोठा असू शकतो. हे आयपॅड प्रो सारखे असेल. वनप्लससाठी हे काही विशेष नाही. वस्तुस्थिती अशी आहे की प्रीमियम मार्केटमध्ये बरेच चांगले Android टॅब्लेट नाहीत. त्यामुळे OnePlus ला वाटते की तो Apple विरुद्ध उभा आहे. हा 12.4-इंचाचा OLED पॅनल फुलएचडी रिझोल्यूशनसह लाँच केला जाऊ शकतो. हा टॅबलेट Android 12 सॉफ्टवेअरसह येतो. त्याचा इंटरफेस OxygenOS सारखा असेल. यामध्ये थ्री-फिंगर स्वाइप फीचर दिले जाऊ शकते.

हे सुद्धा वाचा

128GB इंटरनल स्टोरेज

वनप्लस पॅडला पॉवर देण्यासाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा 2020 चा फ्लॅगशिप प्रोसेसर होता. या टॅब्लेटसाठी तोपर्यंत तो एक चांगला पर्याय असल्याचं दिसतंय. यात 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असू शकते. हे 10900mAh बॅटरीसह येऊ शकते. तसेच 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो. वनप्लस पॅडमध्ये 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि ब्लूटूथ ५.१ सपोर्ट दिला जाऊ शकतो. यात 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेन्सर असेल. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा दिला जाऊ शकतो. वनप्लस या वर्षी अनेक स्मार्टफोन लाँच करत आहे. ते ग्राहकांना सर्व किंमतीत फोन पुरवत आहे. त्याच वेळी ज्या वापरकर्त्यांना टॅबलेटची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी हे एक महत्त्वाचे लाँच असेल.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.