Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Online Passport : आता फक्त पाच दिवसात बनणार पासपोर्ट! अशा प्रकारे करा आवेदन

15 दिवसांऐवजी आता 5 दिवसात पासपोर्ट मिळणार आहे. एवढ्या कमी वेळात पासपोर्ट बनवून तुम्ही देशाबाहेर कुठेही जाऊ शकता. मात्र,..

Online Passport : आता फक्त पाच दिवसात बनणार पासपोर्ट! अशा प्रकारे करा आवेदन
पोसपोर्टImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 2:24 PM

नवी दिल्ली, तुम्ही देशाबाहेर प्रवास करण्याचा विचार करत आहात का? पण पासपोर्ट नसल्यामुळे तुमची योजना खोळंबत असेल तर तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. पासपोर्ट काढू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्लीत पासपोर्ट पडताळणीची सुविधा पूर्णपणे स्वयंचलित (Online Passport) होणार आहे. आता पासपोर्ट काढण्यासाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. 15 दिवसांऐवजी आता 5 दिवसात पासपोर्ट मिळणार आहे. एवढ्या कमी वेळात पासपोर्ट बनवून तुम्ही देशाबाहेर कुठेही जाऊ शकता. मात्र, सध्या दिल्लीतच पासपोर्टची पडताळणी पूर्णपणे स्वयंचलित होणार आहे. पासपोर्ट कसा बनवता येईल ते आपण जाणून घेऊया.

पासपोर्ट कसा बनवायचा?

जर तुम्ही भारतीय नागरिक असाल आणि तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. पासपोर्ट बनविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या स्टेप्सचे पालन करावे लागेल.

हे सुद्धा वाचा

या स्टेप्स वापरा

  1. सर्व प्रथम पासपोर्ट सेवा ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करा.
  2. यानंतर पासपोर्ट सेवा ऑनलाइन पोर्टलवर लॉगिन करा.
  3. त्यानंतर GEP लिंकसाठी Apply for background verification वर क्लिक करा.
  4. यानंतर फॉर्ममध्ये माहिती भरा आणि नंतर सबमिट करा.
  5. आता Pay And Schedule Appointment ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
  6. त्यानंतर तुम्हाला जिथे अपॉइंटमेंट बुक करायची आहे ते ठिकाण निवडा.
  7. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करा.
  8. यानंतर प्रिंट अॅप्लिकेशन रिसीप्टच्या पर्यायावर क्लिक करा. आता अर्जाची प्रिंट प्रिंटरमधून बाहेर येईल. तुमच्या मोबाईलवर अपॉइंटमेंटचा मेसेजही येईल, तो सेव्ह करा.
  9. पासपोर्ट व्हेरिफिकेशनची सुविधा पूर्णपणे ऑनलाइन असेल, तर पोलिस व्हेरिफिकेशनची कोणतीही अडचण येणार नाही.

पोस्ट ऑफिसद्वारे पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट

सप्टेंबर 2022 मध्ये लागू झालेल्या नवीन नियमानुसार, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. नागरिक ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांद्वारे (POPSKs) हा अर्ज करू शकतात. तत्पूर्वी याबाबत निवेदन जरी करत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं होत की, गेल्या काही महिन्यांपासून पासपोर्ट बनवण्यासाठी पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटच्या (पीसीसी) मागणीत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रातून पासपोर्ट व्हेरिफिकेशनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातच पोलिस मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया अनिवार्य आहे, कारण अर्जदाराच्या गुन्हेगारी नोंदी जर असतील तर, त्यांना पासपोर्ट मिळू देण्यापूर्वी तपासणे आवश्यक आहे.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.