Online Sale: स्वस्तात घेऊ शकता iphone, कुठे सुरू आहे ऑनलाईन सेल?
येथून तुम्ही iPhone 14 सीरीज स्वस्तात खरेदी करू शकाल. सेलमध्ये या स्मार्टफोनवर सर्वोत्तम ऑफर उपलब्ध आहेत.
मुंबई, Amazon आणि Flipkart वर वर्षातील पहिला बंपर सेल सुरु झाला आहे. सेलमध्ये तुम्ही आकर्षक किंमतीत आयफोन खरेदी करू शकता. सध्या iphone वर हजारो रूपयांची सुट देण्यात येत आहे. तुम्ही Amazon वरून 60 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत iPhone 13 खरेदी करू शकता. Apple च्या अधिकृत वेबसाइटवर iPhone 13 ची किंमत 69,900 रुपये आहे. याशीवाय, तुम्ही फ्लिपकार्टवरूनदेखील iPhone 14 सीरीज स्वस्तात खरेदी करू शकाल. सेलमध्ये या स्मार्टफोनवर सर्वोत्तम ऑफर उपलब्ध आहेत.
कधीपर्यंत आहे ऑफर?
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 15 जानेवारीपासून सेल सुरू होत आहे. हा सेल 20 जानेवारीपर्यंत चालणार आहे. फ्लिपकार्ट प्लस आणि अॅमेझॉन प्राइम वापरकर्ते एक दिवस अगोदर सेलमध्ये प्रवेश करू शकतात. चला जाणून घेऊया iPhone 13 वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती.
Amazon वर काय ऑफर आहे?
तुम्ही अॅमेझॉन सेलमधून 57,249 रुपयांच्या किमतीत Apple iPhone 13 खरेदी करू शकता. डिस्काउंटनंतर हे फोन 58,999 रुपयांच्या किमतीत लिस्ट झाले आहेत. ही किंमत फोनच्या 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे.
एसबीआय क्रेडिट कार्डने यावर 1250 रुपयांची बँक सूट उपलब्ध आहे. याशिवाय Amazon Pay Later योजनेचा लाभ घेऊन तुम्ही 600 रुपये वाचवू शकता. फोनवर एक्सचेंज ऑफर आणि इतर फायदे देखील उपलब्ध आहेत.
फ्लिपकार्टवरही आहे सूट
Flipkart वर तुम्हाला iPhone 14 स्मार्टफोन 70 हजार रुपयांपेक्षा कमी प्रारंभिक किमतीत मिळेल. कंपनीने अद्याप त्याची किंमत जाहीर केलेली नाही. सध्या, आयफोन 14 फ्लिपकार्टवर 73,990 रुपयांच्या किंमतीला सूचीबद्ध आहे. कंपनीने ते 79,990 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केले आहे.
या दोघांशिवाय, तुम्ही फ्लिपकार्टवरून स्वस्तात iPhone 11 देखील खरेदी करू शकता. तुम्ही अगदी कमी किमतीत iPhone 12 mini देखील खरेदी करू शकता. Flipkart सेलमध्ये तुम्हाला 60 हजार रुपयांमध्ये iPhone 13 मिळत आहे. मात्र, बिग बिलियन डेज सेलमध्ये हा फोन 50 हजार रुपयांपर्यंतच्या किमतीत विकला गेला आहे.