OpenAI चा धमाका; आता WhatsApp वर पण चालणार, कसं वापरणार? इथं वाचा

WhatsApp OpenAI ChatGPT : चॅटजीपीटी आता तुम्ही कॉल आणि व्हॉट्सॲपसाठी वापरता येईल. ओपनएआयने चॅटबॉटला कॉल आणि व्हॉट्सॲपशी जोडल्या गेले आहे. कॉलवर चॅटजीपीटीचा ॲक्सेस सर्वच युझर्सला मिळणार नाही. व्हॉट्सॲपवर चॅटबॉट उपलब्ध आहे. तो असा वापरता येईल.

OpenAI चा धमाका; आता WhatsApp वर पण चालणार, कसं वापरणार? इथं वाचा
चॅटजीपीटी
Follow us
| Updated on: Dec 19, 2024 | 4:39 PM

OpenAI ने चॅटबॉट ChatGPT चा विस्तार केला आहे. आतापर्यंत चॅटबॉटचा वापर करण्यासाठी ॲप डाऊनलोड करावा लागत होता. अथवा युझर्सला वेब व्हर्जनचा वापर वाढवावा लागत होता. आता तुम्ही चॅटबोट थेट व्हॉट्सॲपवर वा कॉलवर ॲक्सेस करू शकता. कॉलवर चॅटजीपीटीचा ॲक्सेस सर्वच युझर्सला मिळणार नाही. व्हॉट्सॲपवर चॅटबॉट उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला एक नंबर डायल करावा लागणार आहे. वा क्रमांकावर व्हॉट्सॲप करावे लागेल. तुम्हाला चॅटबॉट वापरता येईल. अमेरिकेतील युझर्सला चॅटजीपीटीचा फ्री ॲक्सेस कॉलवर मिळेल, पण ही सुविधा केवळ 15 मिनिटांसाठी असेल असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कोणाला मिळणार व्हॉट्सॲपवर ChatGPT

व्हॉट्सॲपवर ChatGPT त्या प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असेल, जिथे चॅटजीपीटीची सेवा पूर्वीपासून सुरू आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे, ही सेवा सुरू करण्यासाठी अमेरिकेतील वापरकर्त्यांना चॅटजीपीटीला प्रत्येक महिने 15 मिनिटांचा व्हॉईस कॉल ॲक्सेस मिळेल. ही सेवा मोफत असेल. भविष्यात त्यात बदल होण्याची शक्यता आहे. कंपनी या नवीन पद्धतीने लोकांपर्यंत चॅटजीपीटी अगदी सोप्या पद्धतीने पोहचवू इच्छित आहे.

हे सुद्धा वाचा

खासकरून त्या लोकांपर्यंत चॅटजीपीटी पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, ज्याच्यापर्यंत आतापर्यंत AI पोहचले नाही. The Verge च्या नियमानुसार, OpenAI च्या चीफ प्रोडक्ट ऑफिसर Kevin Well ने सांगीतले की, हे फीचर काही आठवड्यात विकसीत केले आहे.

मोबाईलवर चॅटजीपीटीच्या ॲक्सेससाठी ओपनएआयने रिअल टाईम API चा वापर केला आहे. तर WhatsApp वर GPT 4o Mini चा वापर केला आहे. ते एपीआय सोबत जोडण्यात आले आहे. जे युझर्स प्रगत फीचर, जास्त वापर करू इच्छितात, त्यांना नेहमीचे ChatGPT खाते वापरणे फायद्याचे ठरेल.

WhatsApp वर कसे वापरणार ChatGPT?

अमेरिकेतील वापरकर्ते 1-800-242-8478 वर कॉल करून चॅटबॉटचा वापर करू शकता. येथील युझर्स हे लँडलाईनच्या माध्यमातून चॅटबॉटचा वापर करू शकता. तर व्हॉट्सॲपवर वापर करण्यासाठी याच संबंधित क्रमांकाचा वापर करता येईल. या क्रमांकावर मॅसेज करून युझर्सला ChatGPT वापरता येईल.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.