OpenAI | ChatGPT सुरु करणाऱ्याचीच गेली की खुर्ची, कंपनी म्हणते आता नाही राहिला भरवसा

| Updated on: Nov 18, 2023 | 10:21 AM

OpenAI | जगातील अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आणण्यासाठी कारणीभूत कंपनीत मोठा भूंकप झाला. ChatGPT सुरु करणाऱ्या कंपनीच्या एका संस्थापकाला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला तर दुसऱ्याने राजीनामा देण्याचे मनाशी पक्कं केले. भारतीय वंशाच्या मीरा मुरात्ती या सध्या अंतरिम सीईओ म्हणून काम पाहतील.

OpenAI | ChatGPT सुरु करणाऱ्याचीच गेली की खुर्ची, कंपनी म्हणते आता नाही राहिला भरवसा
Follow us on

नवी दिल्ली | 18 नोव्हेंबर 2023 : कृत्रिम बुद्धीमतेत क्रांती घडवणाऱ्या OpenAI कंपनीत भूकंप आला आहे. या नवतंत्रज्ञानामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. याविरोधात हॉलिवूडचे लेखक आणि इतर मंडळी अमेरिकेत रस्त्यावर उतरले. आता त्याच कंपनीत पडझड सुरु झाली आहे. चॅटजीपीटी कंपनीचे सीईओ आणि सहसंस्थापक सॅम ऑल्टमनला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. तर OpenAI चे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन पण बोर्डाचे अध्यक्षपद सोडणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे नव तंत्रज्ञाना क्षेत्राला जबर धक्का बसला आहे. तर अनेक मंडळींना हा बदल सुखावणारा ठरु शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

आता भरवसा उरला नाही

हे सुद्धा वाचा

चॅटजीपीटीचे सीईओ आणि सहसंस्थापक सॅम ऑल्टमन यांच्यावर बोर्ड नाराज होते. विचारविनिमयानंतर कंपनीच्या बोर्डाने त्यांना पदावरुन हटविण्याचा निर्णय घेतला. सॅमची भूमिका अस्पष्ट असल्याचा ठपका बोर्डाने ठेवला. बोर्डातील सदस्य आणि सॅम यांच्यात संवाद कमी झाल्याचे एकूणच या प्रकरणावरुन दिसून येते. बोर्डाला सॅम ऑल्टमनवर विश्वास राहिला नसल्याचे कळविण्यात आले आणि त्याला राजीनामा देण्यास सांगण्यात आले, असे ओपनएआयने जाहीर केले. याविषयीचे निवेदन कंपनीने दिले आहे.

ग्रेग ब्रॉकमन यांचे मन रमेना

या घडामोडी घडत असतानाच ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी बोर्डाचे अध्यक्षपद सोडणार असल्याचे जाहीर केले. कंपनीत अनेक प्रतिभावान लोकांसोबत कामाचा चांगला अनुभव आला. आपण आनंदी असल्याचे ट्विट ब्रॉकमन यांनी केले. ओपनआयला एकापाठोपाठ दोन झटके बसले आहेत.

मीरा मुरात्ती यांच्यावर जबाबदारी

कोट्यवधी नोकऱ्या गिळण्याची शक्यता असणाऱ्या या नवतंत्रज्ञान कंपनीत लागोपाठ दोन धक्के बसले. बोर्डाने सीईओला बाहेरचा रस्ता दाखवला. तर कंपनीच्या अध्यक्षांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या घडामोडी घडत असताना कंपनीच्या मंडळाने भारतीय वंशाच्या मीरा मुरात्ती यांच्यावर कंपनीची जबाबदारी सोपवली. मुरात्ती या सध्या अंतरिम सीईओ म्हणून काम पाहतील.


8 वर्षांपूर्वी अपार्टमेंटमध्ये प्रयोग

ब्रॉकमन यांनी या सर्व घडामोडींवर त्यांचे मन मोकळे केले. 8 वर्षांपूर्वी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा प्रयोग सुरु झाला. सर्वांनी मिळून हे महत कठीण कार्य पूर्ण केले. या सर्वांचा अभिमान असल्याचे ब्रॉकमन म्हणाले. त्यांनी जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. अत्यंत कठीण काळात अनेक गोष्टी मिळवल्याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धीमता भविष्यात मानवजातीसाठी लाभदायक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.