मोठी बॅटरी आणि शानदार फीचर्ससह OPPO चा किफायतशीर स्मार्टफोन बाजारात, जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: Oct 26, 2021 | 6:27 PM

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आपला नवीन मोबाईल फोन देशात लॉन्च केला आहे. त्याचे नाव Oppo A56 5G आहे. हा एक परवडणारा स्मार्टफोन आहे, यात मजबूत बॅटरी आणि MediaTek Dimensity 700 चिपसेट आहे.

मोठी बॅटरी आणि शानदार फीचर्ससह OPPO चा किफायतशीर स्मार्टफोन बाजारात, जाणून घ्या सर्वकाही
Oppo A56 5G
Follow us on

मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आपला नवीन मोबाईल फोन देशात लॉन्च केला आहे. त्याचे नाव Oppo A56 5G आहे. हा एक परवडणारा स्मार्टफोन आहे, यात मजबूत बॅटरी आणि MediaTek Dimensity 700 चिपसेट आहे. यामध्ये बॅक पॅनलवर ग्रेडियंट बॅक डिझाइन देण्यात आले आहे. त्याच्या बॅक पॅनलला आयताकृती मॉड्यूलचा आकार देण्यात आला आहे. (Oppo A56 5G launched With MediaTek Dimensity 700 SoC and 5,000mAh Battery, know Price, Specifications)

हा फोन Oppo A55 चं अपग्रेड वेरिएंट आहे, ज्यामध्ये बॅक पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला होता, पण आता कंपनी ने A56 5G मध्ये बॅक पॅनल वर डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे.

Oppo A56 5G चे स्पेसिफिकेशन्स

Oppo A56 5G च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यात 6.5-इंचाची LCD स्क्रीन देण्यात आली आहे, जी वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह येते. तसेच, यामध्ये MediaTek Dimensity 700 चिपसेट वापरण्यात आला आहे, जो 6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. वापरकर्ते आवश्यक असल्यास मायक्रोएसडी कार्डद्वारे या फोनची स्टोरेज स्पेस वाढवू शकतात.

कॅमेरा सेटअप

Oppo A56 5G च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या बॅक पॅनलवर डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा सेन्सर आहे, तर सेकेंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. यात नॉच स्टाइलमध्ये फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हा फोन Android 11 आधारित ColorOS वर काम करतो. या फोनमध्ये NFC सपोर्ट आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, जो पॉवर बटणावर आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स बायोमेट्रिक पद्धतीने स्मार्टफोन अनलॉक करु शकतील.

या Oppo स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी 10W फास्ट चार्जरसह येते. मात्र, या फोनच्या चार्जिंग क्षमतेबाबत माहिती देण्यात आलेली नाही. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनची किंमत 1,599 युआन (जवळपास 18,783 रुपये) इतकी आहे.

इतर बातम्या

लेनोवो टॅब K10 टॅब्लेट भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

ठरलं ! JioPhone Next ‘या’ दिवशी भारतात दाखल होणार, जाणून घ्या संभाव्य किंमत, तपशील आणि वैशिष्ट्ये

6000mAh बॅटरीसह येतात ‘हे’ 4 फोन, ज्याची सुरवातीची किंमत आहे 7,299 रुपये

(Oppo A56 5G launched With MediaTek Dimensity 700 SoC and 5,000mAh Battery, know Price, Specifications)