OPPO च्या सेल्फी पॉप अप कॅमेरा स्मार्टफोनवर 2 हजारांची सूट
मुंबई : OPPO ने Oppo F11 Pro आणि Oppo A5 या दोन स्मार्टफोनवर 2 हजार रुपयाची सूट दिली आहे. या दोन्ही फोनमध्ये पॉप अप सेल्फी कॅमेरा आणि 48 मेगापिक्सल यांसारखे नवनवीन फिचर्स आहेत. Oppo F11 Pro आणि Oppo A5 हे स्मार्टफोन सध्या बाजारात ट्रेंडीग आहेत. त्यामुळे OPPO कंपनीने या स्मार्टफोनवर 2000 रुपयांची सूट देण्याची घोषणा […]
मुंबई : OPPO ने Oppo F11 Pro आणि Oppo A5 या दोन स्मार्टफोनवर 2 हजार रुपयाची सूट दिली आहे. या दोन्ही फोनमध्ये पॉप अप सेल्फी कॅमेरा आणि 48 मेगापिक्सल यांसारखे नवनवीन फिचर्स आहेत. Oppo F11 Pro आणि Oppo A5 हे स्मार्टफोन सध्या बाजारात ट्रेंडीग आहेत. त्यामुळे OPPO कंपनीने या स्मार्टफोनवर 2000 रुपयांची सूट देण्याची घोषणा केली आहे.
Oppo F11 Pro स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
Oppo F11 Pro या स्मार्टफोन 6.5 इंच फुल एचडी डिस्प्ले आहे. त्याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये Android 9.0 Pie अँड्रॉईड व्हर्जन देण्यात आलं आहे. या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा देण्यात आला असून 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. विशेष म्हणजे वन प्लसच्या नवीन फोनप्रमाणे या फोनमध्ये पॉप अप सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे.
Oppo F11 Pro या स्मार्टफोनची किंमत 24 हजार 990 रुपये आहे. मात्र ओप्पोद्वारे या फोनच्या किंमतीत काही महिन्यांपूवी 2 हजारांची घट करण्यात आली होती. त्यामुळे सध्या या फोनची किंमत 22 हजार 990 आहे. मात्र आता ओप्पोद्वारे 2 हजारांची डिस्काऊंट देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन केवळ 20 हजार 990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. हा डिस्काऊंट केवळ 6GB RAM+ 64GB स्टोरेज व्हेरियंटासाठी देण्यात येत आहे. हा फोन तुम्हाला ऑनलाईनसह ऑफलाईनही खरेदी करता येऊ शकतो.
Oppo A5 या स्मार्टफोनची किंमत 12 हजार 990 रुपये आहे. या फोनवर कंपनीने 1 हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे. त्यामुळे हा फोन ग्राहकाला केवळ 11 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.