बहुप्रतीक्षित Oppo F19 Pro + 5G आणि Band Style लाँच होणार, उरले फक्त काही तास
ओप्पोची ही नवीन सिरीज ओप्पोच्या F17 सिरीजला पुढे घेऊ जाणार आहे. सोबतच ओप्पोचा फिटनेस बँडदेखील (Oppo Band Style) आज लाँच केला जाणार आहे.
मुंबई : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी OPPO ने काही दिवसांपूर्वी त्यांच्या F19 सिरीजची घोषणा केली होती. तेव्हापासून युजर्स या फोनच्या लाँचिंगची वाट पाहात आहेत. अखेर आज (8 मार्च) ही सिरीज लाँच केली जाणार आहे. या सिरीजमधील स्मार्टफोन्स हे भारतात अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही ई-कॉमर्स साईटवर खरेदीसाठी उपलब्ध असतील. ओप्पोची ही नवीन सिरीज ओप्पोच्या F17 सिरीजला पुढे घेऊ जाणार (Successor) आहे. सोबतच ओप्पोचा फिटनेस बँडदेखील (Oppo Band Style) आज लाँच केला जाणार आहे. (OPPO F19 Pro 5G and Band Style lauching today in India)
या सिरीजमध्ये Oppo F19, Oppo F19 Pro आणि Oppo F19 Pro+ 5G हे तीन स्मार्टफोन लॉन्च केले जातील. लाँचिंगपूर्वीच या स्मार्टफोनची काही वैशिष्ट्ये (फीचर्स) लीक झाली आहेत. तिन्ही स्मार्टफोन्सच्या नावावरुन कळतंय की, केवळ OPPO F19 सिरीजमधील केवळ OPPO F19 Pro + 5G या स्मार्टफोनमध्ये 5 जी कनेक्टिव्हिटी मिळेल. या फोनचा यापूर्वीच Google ARCore डिव्हाईसेसच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. अद्याप या स्मार्टफोनच्या किंमतींबाबत कोणताही खुलासा कंपनीकडून करण्यात आलेला नाही.
OPPO F19 Pro चे फीचर्स
OPPO F19 Pro च्या स्पेसिफिकेशनबाबत बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचांचा पंच-होल AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. सोबतच फोनमध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा + 8MP (अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स) + 2MP (मोनोक्रोम) + 2MP (मॅक्रो) सेंसरचा समावेश असेल. सोबतच सेल्फीसाठी या फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा दिला जाईल. OPPO F19 Pro स्मार्टफोन ColorOS 1 अँड्रॉयड 11 वर आधारित असेल. यामध्ये 4,310mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते, जो 30W VOOC फ्लॅश चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करेल.
OPPO F19 Pro+ 5G चे फीचर्स
OPPO F19 Pro+ 5G च्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये 6.4 इंचांचा पंच होल AMOLED डिस्प्ले मिळेल. सोबतच हा फोन MediaTek Dimensity 800U प्रोसेसरने सुसज्ज असा असेल. यामध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज स्पेस मिळेल. तसेच या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला जाईल. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 30W च्या फास्ट चार्जिंगसह 4500mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल.
12 वर्कआऊट मोड्ससह Oppo चा फिटनेस बँड लाँच होणार
ओप्पो ही मोबाईल निर्माती कंपनी लवकरच फिटनेस बँड लाँच करणार आहे. ओप्पो बँड स्टाईल (Oppo Band Style) हा या कंपनीचा पहिला फिटनेस बँड असणार आहे. अनेक टेक कंपन्यांनी स्वतःचे फिटनेस बँड लॉन्च केले आहेत आणि आता Oppo कंपनीदेखील त्यांचा पहिला बँड लॉन्च करीत आहे. कोणत्याही स्टँडर्ड फिटनेस बँडप्रमाणे हादेखील एक एंट्री लेव्हल सेगमेंटमधील बँड असेल. रियल टाईम हार्ट रेट मॉनिटरिंग आणि SpO2 मेजरमेंटसह हा बँड सादर केला जाणार आहे. कंपनीने म्हटलं आहे की, या बँडमध्ये तुम्हाला तब्बल 12 वर्कआऊट मोड्स मिळतील.
ओप्पोने आतापर्यंत या Oppo Band Style च्या वैशिष्ट्यांविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. फिटनेस बँड रिअल टाइम हार्ट रेट मॉनिटरिंगसह येईल. त्याच वेळी, Spo2 मॉनिटरिंग देखील प्रदान केलं जाईल जे स्लीप डिसऑर्डर डिटेक्ट करेल. गेल्या वर्षीपासून ऑक्सिमीटरची मागणी वाढली आहे. त्यामुळेच कंपन्या आता प्रत्येक स्मार्टवॉचमध्ये ऑक्सिमीटर फीचर देत आहे.
Airtel युजर्ससाठी गुड न्यूज, IPL चे सामने मोफत पाहता येणार https://t.co/z41tiwHPw5 #AirTel | #IPL | #Cricket | #IPL2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 8, 2021
इतर बातम्या
देशात ‘या’ दोन शहरांत 5G टॉवर आले, जाणून घ्या कधी मिळणार 5G सेवा
लवकरच लाँच होणार OnePlus Nord 2, या फोनमध्ये काय असेल खास