OPPO चे दोन नवीन स्मार्टफोन F19 Pro+ 5G आणि F19 Pro लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी OPPO मोबाईलने नुकतेच भारतात OPPO F19 Pro सिरीजमधील दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.

OPPO चे दोन नवीन स्मार्टफोन F19 Pro+ 5G आणि F19 Pro लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Oppo F19 Pro Series
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 7:12 AM

मुंबई : चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी OPPO मोबाईलने नुकतेच भारतात OPPO F19 Pro सिरीजमधील दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. एका व्हर्चुअल इव्हेंटमध्ये हे दोन्ही स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. Oppo F19 Pro+ 5G आणि Oppo F19 Pro अशी या दोन्ही स्मार्टफोन्सची नावं आहेत. (Oppo F19 Pro and Oppo F19 Pro+ 5G launched in India, know price and specification)

कंपनीने Oppo F19 Pro+ 5G हा स्मार्टफोन 25,990 रुपये या किंमतीसह सादर केला आहे. यामध्ये 8GB RAM आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज स्पेस मिळेल. तर Oppo F19 Pro च्या 8GB रॅम प्लस 128 GB स्टोरेजवाल्या स्मार्टफोनची किंमत 21,490 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. याच स्मार्टफोनच्या 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 23,490 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Oppo F19 Pro+ 5G चे स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा पंच-होल एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी 800 यू (MediaTek Dimensity 800U) ने सुसज्ज अशा Android 11 वर आधारित ColorOS 11.1 वर चालतो. फोटोग्राफीसाठी यात क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर मिळेल. याशिवाय या फोनला पॉवर देण्यासाठी 4310mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 50W च्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कंपनीने हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह बाजारात आणला आहे आणि त्याचा पहिला सेल 17 मार्चपासून सुरु होईल. हा स्मार्टफोन तुम्ही फ्लूएड ब्लॅक आणि क्रिस्टल सिल्व्हर कलरमध्ये खरेदी करू शकता.

Oppo F19 Pro चे स्पेसिफिकेशन्स

कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्लेदेखील दिला आहे आणि हा स्मार्टफोन मीडियाटेक हेलिओ पी 95 चिपसेटने सुसज्ज आहे. ओप्पोने हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेजसह सादर केला आहे. याशिवाय फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय फोनला पॉवर देण्यासाठी 4310mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा फोन फ्लूएड ब्लॅक आणि क्रिस्टल सिल्व्हर कलरमध्ये देखील सादर करण्यात आला आहे. या फोनच्या त्याच्या 8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटचा पहिला सेल 17 मार्चला असेल आणि 8 जीबी + 256 जीबी व्हेरिएंटचा पहिला सेल 25 मार्चला असेल.

Oppo चा फिटनेस बँड लाँच

या दोन स्मार्टफोनसह कंपनीने ओप्पो बँड स्टाईल (Oppo Band Style) हा फिटनेस बँडसुद्धा बाजारात आणला असून यामध्ये 1.1 इंचांची फुल कलर AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. त्यामध्ये SpO2 मॉनिटरिंग, स्लीप मॉनिटरिंग सारखे फीचर्स मिळतील. या बँडची किंमत 2999 रुपये ठेवण्यात आली आहे. 8 मार्च ते 23 मार्च या कालावधीत हा बँड तुम्ही अमेझॉन या ई-कॉमर्स साईटवरुन अवघ्या 2799 रुपयांत खरेदी करु शकता.

इतर बातम्या

मूनशॉट फीचरसह दमदार कॅमेरा, ‘या’ दिवशी लाँच होणार OnePlus 9, OnePlus 9 Pro

Flipkart Carnival Sale सुरु, स्मार्टफोन्सवर बम्पर डिस्काऊंट, आयफोनवर 10000 रुपयांची सूट

Jio युजर्ससाठी खुशखबर! IPL चे सामने मोफत पाहता येणार

(Oppo F19 Pro and Oppo F19 Pro+ 5G launched in India, know price and specification)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.