Oppo F19 Series मध्ये 3 नवे स्मार्टफोन लाँच होणार, काय असणार खास?

ओप्पो कंपनीने (OPPO) फेब्रुवारी महिन्यात OPPO F19 सिरीजबाबत घोषणा केली होती, (Oppo F19 Series will launch with 3 new smartphones)

Oppo F19 Series मध्ये 3 नवे स्मार्टफोन लाँच होणार, काय असणार खास?
Oppo-Reno-5-4G
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 8:38 AM

मुंबई : ओप्पो कंपनीने (OPPO) फेब्रुवारी महिन्यात OPPO F19 सिरीजबाबत घोषणा केली होती, परंतु अद्याप ही सिरीज लाँच करण्यात आलेली नाही. नुकत्याच रिपोर्ट्समधून अशी माहिती मिळाली आहे की, ओप्पोच्या नव्या सिरीजमधील स्मार्टफोन्स मार्चमध्ये भारतीय मार्केटमध्ये डेब्यू करतील. (Oppo F19 Series 3 new smartphones will be launch know price and features)

OPPO F19 सिरीजचे पोस्टर OPPO सेल्सच्या सेल्स एक्झिक्युटिव्हने MySmartPrice वर शेअर केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोस्टरमध्ये दोन डिव्हाईस OPPO F19 प्रो आणि OPPO F19 प्रो + 5 जी पाहायला मिळाले आहेत. असं म्हटलं जातंय की लवकरच हे स्मार्टफोन भारतात लाँच केले जातील. अद्याप या स्मार्टफोनच्या किंमतींबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, या सिरीजअंतर्गत तीन नवे स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात.

  1. OPPO F19
  2. OPPO F19 Pro
  3. OPPO F19 Pro + 5G

तिन्ही स्मार्टफोन्सच्या नावावरुन कळतंय की, केवळ OPPO F19 सिरीजमधील OPPO F19 Pro + 5G या स्मार्टफोनमध्ये 5 जी कनेक्टिव्हिटी मिळेल. या फोनचा यापूर्वीच Google ARCore डिव्हाईसेसच्या यादीत समावेष करण्यात आला आहे.

OPPO-F19

OPPO F19 Pro चे फीचर्स

OPPO F19 Pro च्या स्पेसिफिकेशनबाबत बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचांचा पंच-होल AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. सोबतच फोनमध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा + 8MP (अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स) + 2MP (मोनोक्रोम) + 2MP (मॅक्रो) सेंसरचा समावेश असेल. सोबतच सेल्फीसाठी या फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा दिला जाईल. OPPO F19 Pro स्मार्टफोन ColorOS 1 अँड्रॉयड 11 वर आधारित असेल. यामध्ये 4,310mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते, जो 30W VOOC फ्लॅश चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करेल.

हेही वाचा

ट्रिपल कॅमेरासह Redmi 9 Power चं 6GB रॅम वेरिएंट भारतात लाँच, किंमत…

64MP Quad Camera, 7000mAh बॅटरी, इन्स्टंट डिस्काऊंटसह Samsung Galaxy F62 चा पहिला सेल

अवघ्या 10 दिवसात 2.5 लाख स्मार्टफोन्सची विक्री, POCO च्या ‘या’ फोनचा भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ

(Oppo F19 Series 3 new smartphones will be launch know price and features)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.