ओप्पो लवकरच 160W फास्ट चार्जर मार्केटमध्ये आणणार आहे. ज्याच्या मदतीने स्मार्टफोन कमी वेळात चार्ज करता येईल. याची माहीती चीनच्या सर्टिफिकेशन साइट 3सी वरून मिळते आहे. ओप्पोच्या या फास्ट चार्जिंगच्या मदतीने तुम्हाला तुमच्या फोनला एक नवीन फीचर देण्याची संधी मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात याबद्दल.
VCK8HACH हे ओप्पोच्या फास्ट चार्जिंग अडॅप्टरसाठी आहे. जे Heyuan Huntqi Industrial Co. Ltd ने विकसित केले आहे. या फास्ट चार्जिंग अॅडॉप्टरला 20V 8A स्पीड मिळते. जी 160W क्षमतेची आहे. Gizmochina नावाच्या वेबसाइटने याचा स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत.
जुन्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले होते की ओप्पोला या वर्षी फास्ट चार्जिंगचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करायचे आहे. जे ते त्यांच्या काही आगामी स्मार्टफोनमध्ये वापरू शकते. सध्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर Oppo Find X5 सीरीजमध्ये हा फास्ट चार्जर दिला जाऊ शकतो.
रेड मॅजिक 7 देखील लवकरच येईल, ज्यामध्ये 165W चा फास्ट चार्जर उपलब्ध असेल. या अॅडॉप्टरची माहिती नुकतीच समोर आली आहे. तसेच OnePlus 10 Pro मध्ये 80W फास्ट चार्जर देण्यात आला आहे.
Xiaomi ने अलीकडेच भारतात दोन Xiaomi स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, जे 120W हायपरचार्ज काम करतात. ते मोबाईल फोनची बॅटरी फक्त 16 मिनिटांत पूर्णपणे चार्ज करते.