मोठा HD डिस्प्ले, 64MP ट्रिपल कॅमेरासह Oppo Reno 7 4G लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
ओप्पोने (Oppo) अलीकडेच त्यांचा ओप्पो रेनो 7 4 जी (Oppo Reno 7 4G) फोन बाजारात सादर केला आहे. हा फोन सध्या इंडोनेशियामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यापूर्वीचे Oppo Reno 7 सिरीजमधील सर्व मॉडेल 5जी (5G) आहेत, ज्यात Oppo Reno 7 Pro 5G, Oppo Reno 7 5G आणि Oppo Reno 7 SE 5G यांचा समावेश आहे.
मुंबई : ओप्पोने (Oppo) अलीकडेच त्यांचा ओप्पो रेनो 7 4 जी (Oppo Reno 7 4G) फोन बाजारात सादर केला आहे. हा फोन सध्या इंडोनेशियामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यापूर्वीचे Oppo Reno 7 सिरीजमधील सर्व मॉडेल 5जी (5G) आहेत, ज्यात Oppo Reno 7 Pro 5G, Oppo Reno 7 5G आणि Oppo Reno 7 SE 5G यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत 4G कनेक्टिव्हिटीसह येणारं नवीन मॉडेल हे या सिरीजमधील पहिलं प्रोडक्ट आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 SoC, 90Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय, Oppo Reno 7 4G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, जो 64 MP च्या प्रायमरी सेन्सरसह येतो. हा फोन कॉस्मिक ब्लॅक आणि सनसेट ऑरेंज या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन अद्याप भारतात लाँच करण्यात आलेला नाही, भारतीय ग्राहक या फोनच्या प्रतीक्षेत आहेत.
- Oppo Reno 7 4G ची किंमत : इंडोनेशियन वेबसाइटवर Oppo Reno 7 4G ची किंमत IDR 5,199,000 (जवळपास 27,420) आहे.
- Oppo Reno 7 4G चा डिस्प्ले : फोनमध्ये 6.43 इंच फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह सुसज्ज आहे.
- Oppo Reno 7 4G मधील स्टोरेज स्पेस : स्मार्टफोन Snapdragon 680 SoC सह सुसज्ज आहे, यामध्ये 8GB RAM आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेज मिळेल.
- Oppo Reno 7 4G चा कॅमेरा : नवीन फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मायक्रोलेन्स आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंसाठी, यात 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
- Oppo Reno 7 4G ची कनेक्टिव्हिटी: फोन 4G LTE, Wi-Fi 5, Bluetooth v5.1, GPS/A-GPS, NFC, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅकसह सुसज्ज आहे. बोर्डवरील सेन्सर्समध्ये एक्सीलरोमीटर, ऑप्टिकल सेन्सर, जायरोस्कोप, पेडोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर यांचा समावेश होतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
- Oppo Reno 7 4G मधील बॅटरी: Oppo Reno 7 4G मध्ये 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 4,500mAh क्षमतेची बॅटरी आहे.
- Oppo Reno 7 4G प्री-ऑर्डर: हा फोन चिनी कंपनीच्या इंडोनेशियन वेबसाइटवर प्री-ऑर्डरसाठी लिस्ट करण्यात आला आहे. Oppo Reno 7 4G साठी फोनची प्री-ऑर्डर करण्याची विंडो 1 एप्रिलपर्यंत खुली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, प्री-ऑर्डर केलेले हँडसेट 2 एप्रिलपासून शिपिंग सुरू होतील.
इतर बातम्या
150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास
Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम
क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स